हिवरखेड : हिवरखेड ग्रामपंचायतला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. नगरविकास विभागातर्फे राजपत्रात याबाबतची उद्षोघणा प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेले २२ वर्षांपासून नगरपंचायतचा दर्जा मिळविण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला यश मिळाले आहे.
विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायतची लोकसंख्या सुमारे ४० हजारांच्या वर आहे. त्यामुळे हिवरखेड नगरपंचायत व्हावी अशी मागमी नागरिकांनी केली होती. त्यासाठी नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू ठेवला होता. आतापर्यंत अनेक आंदोलने, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी, आत्मदहन इशारा, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, बाजारपेठ बंद अशी अनेक प्रकारची आंदोलने हिवरखेडवाशीयांनी केली होती.
नुकताच हिवरखेडवाशीयांनी पत्रकार संघाच्या पुढाकाराने त्यासाठी रक्त संकल्प अभियान राबविले होते. हे रक्त संकल्प आंदोलन निर्णायक ठरले. सोमवार, ता. १३ जून रोजी हिवरखेड ग्रामपंचायतचे संपूर्ण क्षेत्र नगरपंचायत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अकोला जिल्ह्यातील ही बार्शीटाकळीनंतरची दुसरी नगरपंचायत ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हिवरखेडला नगरपंचायतचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यालाही यश मिळाले.
विधान परिषद सदस्य झाल्यावर विधिमंडळात सर्वात पहिला प्रश्न हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायतमधे रुपांतर करण्याबाबतचा उपस्थित केला होता. त्यांनतर वारंवार मंत्रालयात पाठपुरावा केला. या संदर्भात विधिमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनात लक्षवेधी लावली, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक उत्तरे मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमळे हिवरखेड ग्रामपंचायत लवकरच नगरपंचायत होणार. याबाबत अधिसूचना जारी झाली असून, हे श्रेय महाविकास आघाडीचे आहे.
- आमदार अमोल मिटकरी, विधान परिषद सदस्य
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.