अकोला : महापालिका क्षेत्रामध्ये सखोल स्वच्छता मोहीम अंतर्गत शहरातील धार्मिक स्थळे, प्रभाग, नदी परिसर नाले, शहरातील मुख्य रस्ते, उद्याने, सार्वजनिक शौचालये इत्यादी भागांची स्वच्छता करण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गुरुवारी महापालिका आयुक्त तथा प्रशासक कवित द्विवेदी स्वतःच खराटा हाती घेवून रस्त्यावर उतरल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
मनपातर्फे शहरात सखोल स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेत नागरिकांसह स्वयंसेवी संस्थांचा सहभाग वाढवावा म्हणून मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, या मोहिमेत मनपाचे अधिकारी, कर्मचारीच गांभिर्याने घेताना दिसत नसल्याने अखेर गेले दोन दिवसांपासून आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी या स्वतःच सकाळपासून या मोहिमेत सहभागी होत आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या मोहिमेने गती पकडली आहे. गुरुवारी टॉवर चौकातील उड्डाणपुला खाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या परिसरात अस्वच्छतेसाठी कारणीभूत ठरणारे चहा टपऱ्या व इतर व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले. विशेष म्हणजे, खासगी बस, ऑटो रिक्षा यांच्यावरही कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक शाखेला सुचित करण्यात आले होते. यावेळी स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर, स्विय्य सहायक जितेंद्र तिवारी, मुख्य अग्निशमन अधिकारी हारूण मनियार, सहा.अतिक्रमण अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा, मुख्य माळी गौतम कांबळे व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
लोकसहभाग वाढणे आवश्यक
मनपा प्रशासनातर्फे संपूर्ण स्वच्छता अभियान राबविले जात आहे. मात्र, त्याला नागरिकांची साथ मिळणेही आवश्यक आहे. सकाळी स्वच्छ केलेल्या परिसरात नागरिकांनी पुन्हा कचरा आणून टाकला असल्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानात लोकसभा वाढणे आवश्यक आहे.
संघटनांनी घ्यावा पुढाकार!
ज्या प्रकारे घरात दिवाळीला संपूर्ण स्वच्छता केली जाते, त्याच प्रमाणे शहरातही वर्षातून एकदा संपूर्ण स्वच्छता करणे आवश्यक आहे. त्यासाठी अकोला शहर संपूणपणे स्वच्छ करण्याच्या दृष्टीने लोकसहभाग असणे अत्यंत गरजेचे असून, अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिक, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटना यांनी या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदवून सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे.
रस्त्यावर झोपणाऱ्यांना पाठविले निवाऱ्यात
टॉवर चौकातील उड्डाणपुलाच्या खाली घाण झाली आहे. यासाठी कारणीभूत ठरणारे नागरिक येथेच कायमचे वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे या बेघरांना तेथून हटवून मनपाच्या रात्र निवारा येथे जाण्यासाठी सांगण्यात आले. त्या भागाची स्वच्छता करण्यात आली.
अशी केली स्वच्छता!
शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या टॉवरवर अनेकांनी जाहिराती करणारे पोस्टर चिटकविले. ते काढण्यात आले. टॉवर चौक ते जुने बस स्थानक लगतचे आणि आतील व फतेह अली चौकापर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. येथे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांचे साहित्य जप्त करण्यात आले व पुन्हा अतिक्रमण न करण्याबाबत ताकीद देण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.