Pravin Janjal: अकोल्यातील जवान काश्मीरमध्ये शहीद! शासकीय इतमामात साश्रूनयनांनी अखेरचा निरोप

सैन्यदल आणि पोलीसांतर्फे बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना
Pravin Janjal
Pravin Janjal
Updated on

अकोला : जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहिद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होतं. त्यांच्या पार्थिवावर आज मोरगाव भाकरे इथं राजशिष्टाचारानुसार व बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद प्रविण जंजाळ यांच्यामागे पत्नी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. सैनिकांचं गाव म्हणून मोरगांव भाकरे गावाची ओळख असून इथं आजवर 90 युवक सैन्यात भरती झालेले आहेत. (Akola Jawan Pravin Janjal myrter in Kulgam Jammu and Kashmir due to attack by terrorist)

Pravin Janjal
Sharad Pawar: 'तुतारी' आता वाजतच राहणार! निवडणूक आयोगाच्या निर्णयाने शरद पवार यांना मोठा दिलासा

शहिद प्रवीण जंजाळ हे २०१९ मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. तसंच वर्षभरापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. दरम्यान, मणिपूरमध्ये पोस्टिंगनंतर चार महिन्यांपूर्वी त्यांची राष्ट्रीय रायफल्स क्रमांक एकच्या तुकडीला जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम इथं नियुक्ती दिली होती.

Pravin Janjal
Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अँड रन' प्रकरणी राजेश शहा यांना जामीन मंजूर; पोलिसांना कोर्टाचा झटका

खासदार अनुप धोत्रे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार नितीन देशमुख, आमदार संजय कुटे, जि.प.अध्यक्ष संगीता अढाऊ, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्यदलाचे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी ‘शहिद प्रवीण जंजाळ अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादला होता.

Pravin Janjal
Pune Airport New Terminal: पुणे विमानतळाचं नवं टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित!

शहीद प्रवीण जंजाळ नेमके कोण?

प्रवीण जंजाळ यांचं प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचं शिक्षण गायगाव इथं झालं होतं. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील चार महिन्यांपूर्वीच्या शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली. विशेष म्हणजे प्रवीण यांनी घटनेच्या दिवशी म्हणजे काही वेळापूर्वी आपल्या वडिलांना घराच्या बांधकामसाठी 39 हजार रुपये पाठवले होते.

प्रवीण यांचे दोन काकाही होते सैन्यदलात

प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे देखील सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.