कर्जाने तारले तर, सिबिल स्कोअरने मारले, बँकांकडून हप्त्यांचे मेसेज आल्याने ग्राहक अस्वस्थ; आत्महत्येच्या प्रयत्नाने बँकांचे पितळ उघडे

akola karanja news If the debt is saved, the CIBIL score is struck, the customer is upset by the message of installments from the banks; Banks brass open with suicide attempt,
akola karanja news If the debt is saved, the CIBIL score is struck, the customer is upset by the message of installments from the banks; Banks brass open with suicide attempt,
Updated on

कारंजा - लाड (जि.वाशीम) ः सर्वसामान्यांना आयुष्यातील स्वप्नांना, व्यवसायाला वृद्धिंगत करायचे असेल तर, कधी ना कधी कर्ज घ्यावेच लागते. याकरिता त्यांना पतपुरवठ्यासाठी बँकेचे, सहकारी पतसंस्थेचे उंबरठे झिजावावे लागते.

कर्ज हाती आल्याने त्यांच्या काही खाजगी बाबी सोपस्कार रित्या पार पडतात. मात्र, आजरोजी कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होऊन आर्थिक समस्या निर्माण झाली आहे.

त्यामुळे, एके वेळी आर्थिक चणचणीतून तारलेल्या कर्जाचा हप्ता चुकल्यास सिबिल स्कोअर वर परिणाम होऊन पुढील कर्जासाठी अडथळा निर्माण होत असल्याने ग्राहकांसाठी सिबिल मारक ठरत आहे.


लॉकडाउनच्या अगोदर जनजीवन सुरळीत सुरू असताना शहरातील नागरिकांनी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज घेऊन त्याची परतफेड नियमित हप्ते भरुन करीत होते. मात्र, वर्षाचा आर्थिक महिना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्च मध्येच कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविल्याने सर्वच कामकाज ठप्प होऊन लॉकडाउन प्रक्रिया अंमलात आली.

त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक चणचणीचे चटके सोसावे लागले. लॉकडाऊनमध्ये कर्जदारांना तीन महिने हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, असे आवाहन रिजर्व्ह बँकेने सर्व बँकांना केले होते. परंतु, हा कालावधी संपुष्टात आला असल्याचे बँकांद्वारे सांगण्यात येऊन आजमितीला हप्त्यांची आठवण करून देणारे मॅसेज कर्जदारांना येऊ लागल्याने त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे.

शिवाय, खासगी कर्जाचा बोजा वाढल्याने त्याची परतफेड करण्यासाठी काही जण बँकांचे दरवाजे ठोठावत असताना मध्येच सिबिल स्कोअरचा झोल निर्माण होऊन त्यांना परतीचा मार्ग पत्करावा लागत आहे. याच नैराश्यातून कारंजा तालुक्यातील एका युवकाने बँकेतच विषारी औषधं प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

यासारखेच शेकडो नागरिक आजमितीला कर्जासाठी वणवण फिरत आहे. काहींनी फायनान्स कंपनीकडून कर्जाची उचल केली आहे. या कर्जावर चक्रवाढ व्याज आकारले जाईल, असे फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कर्जदारांना फोनवर सांगून कर्जाचे हप्ते भरण्याचा तगादा लावत आहे. त्यामुळे सर्वसामन्यांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे शासनाने लॉकडाउन अंमलात आणले होते. मात्र, आज पाच महिने होऊन सुद्धा कोरोनावर औषध न निघाल्याने कोरोना लॉकडाउनमध्ये शिथिलता देऊन, जन-जीवन पूर्ववत करण्यासाठी काही प्रमाणात बाजारपेठ खुली करण्यात आली. मात्र, काहींच्या हाताला काम नाही, लघुव्यवसाय, उद्योगधंदे पूर्वीप्रमाणे नाही.

शिवाय एकीकडे नागरिकांना कोरोनाच्या प्रादुर्भावाची लागण होण्याची भीती तर, दुसरीकडे कर्जाच्या वसुलीसाठी तगादा, अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य सापडल्याने हैराण झाले आहे. सिबिल स्कोअर लॉकडाउनमुळे खराब झाल्याने पुन्हा कर्ज मिळेनासे झाले आहे. आता नेमके करावे काय, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.