अकोला - कृषी सेवा केंद्र संचालकाने कीटकनाशक खरेदीच्या बदल्यात दिलेला धनादेश न वटल्याने कीटकनाशक कंपनीच्या तक्रारीवरून खटला चालला. या प्रकरणी न्यायालयाने कृषी सेवा केंद्र संचालकाला सहा महिन्याची शिक्षा व एक लाख २० हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. ॲडव्हान्स पेस्टींसाईड ही कंपनी कीटकनाशक बनविते. कंपनीकडून यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथील रहिवाशी तुकाराम नरसिंग तिडके यांनी गौरी कृषी केंद्रासाठी २५ आक्टोंबर २०१८ ला कीटकनाशक खरेदी केली होती. त्यासाठी एक लाख रुपयेचा धनादेश पेस्टींसाईड कंपनीला दिला होता.
कंपनीने तो धनादेश अकोला येथील एका बँक खात्यात जमा केला होता. मात्र तो धनादेश अनादारीत झाला असल्याचे बँकेने कंपनीला कळविले होते. त्यानुसार तुकाराम तिडके यांना नोटीस देऊन तशी माहिती दिली होती. परंतु तिडके यांनी कंपनीची रक्कम दिली नाही. म्हणून न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते.
या प्रकरणात न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन आरोपीस दोषी ठरवत न्यायाधीश जी.डी. पाटील यांच्या न्यायालयाने धनादेश देणाऱ्या गौरी कृषी केंद्राचे प्रोपायटर तुकाराम नरसिंग तिडके याला सहा महिन्याची शिक्षा व एक लाख २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात ऍडव्हान्स पेस्टींसाईड कंपनीच्या वतीने ॲड. मनमोहन सारडा यांनी बाजू मांडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.