Akola : मिटकरींविरोधात कुटासा गावात रोषः मुलभूत सुविधांअभावी आरोग्य धोक्यात

महात्मा गांधी सांगून गेले, खेड्याकडे चला! सरकारही गावाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विकास साधण्याचा प्रयत्न करते. पण याच पैशाचा विनियोग योग्य मार्गाने न झाल्याने गावात सुविधांचा अभाव दिसून येतो.
Akola Kutasa village against amol mitkari Lack of basic facilities development health at risk
Akola Kutasa village against amol mitkari Lack of basic facilities development health at riskSakal
Updated on

अकोला : महात्मा गांधी सांगून गेले, खेड्याकडे चला! सरकारही गावाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विकास साधण्याचा प्रयत्न करते. पण याच पैशाचा विनियोग योग्य मार्गाने न झाल्याने गावात सुविधांचा अभाव दिसून येतो. असाच काहीसा प्रकार अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात दस्तरखुद्द विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा गावात आढळला.

‘सकाळ’च्या टीमने कुटासा येथे भेट देवून विकासाचा आढावा घेतला असता गावात सुविधा केवळ नावालाच असून नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त असल्याचे दिसून आले. विकासाच्या नावावर पैसा पाण्यात गेला असून आज नागरिकांना मुलभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागत असल्याचे वास्तव समोर आले.

तर आमच्या गावचे आमदार असून अमोलभाऊंनी गावाच्या विकासासाठी फारसे काही केले नाही. त्यांना खुप काही करता आले असते अशा खोचक प्रतिक्रियाही नागरिकांनी व्यक्त केल्या. कुटासा येथील प्रवेशद्वारावरील गावाचे नावच मिटलेले दिसून आले.

त्यामुळे गावासमोर उभे राहिले तरी आपण नेमके कुठे आलो याचा उलगडा कुणाला विचारल्या शिवाय होत नाही अशी परिस्थिती आहे. इको टुरिझमकरिता निधी देणार युवकांना रोजगार मिळवून देऊ असे आश्वासनही मिळाले होते.

मात्र ते ही पुर्ण होवू शकले नाही. ज्या कामावर जास्त मलिदा मिळाला अशीच कामे कुटासा येथे केल्या गेली. मंजूर कामामध्ये सिमेंट रस्ता लगत नाली बांधकाम असे मंजूर असल्यावर एकही रस्त्या लगत नाली बांधकाम केल्या गेले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

चिखलातून काढावी लागते वाट

गावातून अकोटकडे व दिनोडा कडे जाणाऱ्या रस्त्याची वाट लागली आहे. गावकऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागते. विद्यार्थ्यांचे रस्त्याअभावी शैक्षणिक नुकसान होत आहे. धडपायी चालता येत नाही तर वाहन कुठून जाणार असा प्रश्न आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक कामासाठी प्रामुख्याने त्रास सहन करावा लागतो.

रस्ताच गायब

कुटासा येथे संपूर्ण रस्ते बांधकामात नियोजनाचा पूर्णतः अभाव दिसून येतो. गावातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम मंजूर नकाशानुसार न झाल्याने आज रस्त्याची वाट लागली आहे. नाल्यातील पाणी रस्त्यावर साचले असून वॉर्ड नंबर ५ व १ मध्ये सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामावर झालेला पैसा पाण्यात गेला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गावातील अंतर्गत रस्ते उखडले असून लहान मुलांना त्रासदायी ठरते.

गावात वॉर्ड क्रमांक ३ मध्ये स्मशान भूमी बांधण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी कुठल्याही सुविधा नाहीत. केवळ टीनशेड बांधले आहे. स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचीही वाट लागली आहे. स्मशानभूमी परिसरात गवत वाढले आहे. आवश्यक त्या सुविधा त्या ठिकाणी नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात याठिकाणी अंत्यविधी करणे जिकरीचे झाले आहे.

बंधाऱ्यामुळे धोका?

गावात जलसंधारण महामंडळ औरंगाबाद व मृद व जलसंधारण विभाग अकोला यांनी बंधारा बांधला आहे. त्याचे उद्‍घाटन स्वतः आमदार अमोल मिटकरी यांच्याहस्ते झाले. मात्र नेमका का बंधारा गावाशेजारी बांधण्याचे कारण काय? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. हा बंधारा कुणाच्या उपयोगाचा व याचे उद्दीष्ट काय? या बाबत आजही गावतील लोकांचा संभ्रम आहे. या बंधाऱ्यामुळे गावातील बौध्द बांधवांच्या धार्मिक प्रेरणास्थान असलेल्या धम्मभूमीला पावसाच्या पाण्याचा कायम धोका राहतो.

जलवाहिनीत गटाराचे पाणी

पिण्याच्या पाण्याची जी टाकी आहे. त्या खाली घाण साचली आहे. टाकीतील मुख्य जलवाहिनी पूर्णतः फुटलेली असून त्याच जलवाहिनीमध्ये गटाराचे पाणी साचले जाते. यामुळे गावातील ६ ते ७ हजार लोकांचे आरोग्य आज धोक्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.