अकोला : भीम जयंतीला मद्यविक्री बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश ‘वंचित’च्या मागणीला यश
भीम जयंतीला मद्यविक्री बंद
भीम जयंतीला मद्यविक्री बंदsakla
Updated on

अकोला: वंचित बहूजन युवा आघाडीच्या पुढाकाराने भिमजयंती संदर्भात नियोजन भवनात आयोजित सभेमध्ये पक्षाचे पदाधिकारी राजेंद्र पातोडे, गजानन गवई यांनी परवानगी, मिरवणूक बाबत जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. त्यातच गुरुवार, ता. १४ एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याची मागणी देखील करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी ता. १४ एप्रिल २०२२ रोजी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ मधील कलम १४२ (१) अन्वये गुरुवारी (ता. १४) कायदा सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी निर्गमित केले.

या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाची अनुज्ञप्ती तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल, असेही आदेशात स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाचे वंचित बहुजन युवा आघाडीने स्वागत केले आहे. जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.