Akola Latest News : प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यात स्थानिक पुढारी पाहुणे; बावनकुळेंच्या दौऱ्याचा डोलारा पेलला राजू पाटील राजेंनीच

दुसरीकडे भाजपच्या तालुकाध्यक्षांविरोधात भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी चक्क पोलिसात तक्रार दिली आहे.
Akola
AkolaSakal
Updated on

वाशीम - एखाद्या राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जिल्ह्याच्या दौऱ्यावर असेल तर सगळी पक्षसंघटना कामाला लागते. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्हा दौऱ्यात स्थानिक पुढारी फक्त व्यासपीठावरच दिसले. भाजपचे लोकसभा प्रभारी राजू पाटील राजे यांनी पुढाकार घेतल्यानेच बावनकुळेंचा दौरा यशस्वी झाला.

Akola
Mumbai Local News : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात पादचारी पुलाची रखडपट्टी तूर्तास झाली दूर !

अन्यथा भाजपच्या वाशीम शहरातील तिरंगा यात्रेसारखीच गत प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याची झाली असती, अशा प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांमधून उमटत आहेत. दुसरीकडे भाजपच्या तालुकाध्यक्षांविरोधात भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी चक्क पोलिसात तक्रार दिली आहे.

जुन्या जाणत्या व लोकसंग्रह असलेल्या कार्यकर्त्यांना बळ दिले जाते, हा या पक्षाचा इतिहास असताना गेल्या आठ वर्षात पक्षाचे वेगाने काॅंग्रेसीकरण झाले आहे. वाशीम जिल्ह्यात तर जनसंग्रह असलेल्या कार्यकर्त्यांना अस्तित्वात नसलेल्या पदाचे चाॅकलेट देऊन क्षमता व जनसंग्रह नसलेल्यांच्या हातात पक्षाची धुरा देण्याची पद्धत रुढ झाली आहे.

Akola
Pune: स्वस्तात दुचाकी देतो म्हणून पुणे जिल्ह्यातील शेकडो आशा सेविकांची करोडोंची फसवणूक; तक्रार करुनही कारवाई होईना...

गुरुवारी( ता.२४) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा वाशीम जिल्ह्यात संपर्क दौरा पार पडला. या दौऱ्यात भाजपचे विद्यमान पदाधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने प्रदेशाध्यक्षांचा दौरा फसतो की काय असा प्रश्न निर्माण झाला होता.

जुने कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. कारण स्वातंत्र्यदिनाला भाजपच्या तिरंगा रॅलीच्या नियोजनाकडेच अनेकांनी पाठ फिरविल्याने ही रॅली वाशीम शहरात निघालीच नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याआधी एक दिवस भाजपचे वाशीम यवतमाळ लोकसभेचे संयोजक राजू पाटील राजे यांनी एकट्याच्या बळावर तयारी सुरू केली.

Akola
Mumbai Police Tribute : 'चांद्रयान-3'च्या यशाबद्दल मुंबई पोलिसांचं खास म्युझिकल ट्रिब्युट; पाहा व्हिडिओ

एका दिवसात कारंजा ते वाशीम या मार्गावर पक्षाचे ध्वज, पताका व बॅनर लावले गेले. वाशीम शहरात स्वागत कमानी उभारल्या गेल्या. कार्यक्रमाच्या ठिकाणी चोख व्यवस्था तयार केल्याने ऐनवेळी बावनकुळेंचा दौरा पंचतारांकित ठरला.

या धामधुमीत पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मात्र बघ्याच्या भूमिकेत वावरत होते. या दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण अधोरेखित झाले. पदाची खैरात घेताना सर्वात पुढे आणि कार्यक्रम आयोजित करण्यास सर्वात मागे ही मानसिकता पक्षाला रसातळाला नेत असल्याच्या प्रतिक्रिया निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांमधून उमटल्या.

जिल्हा उपाध्यक्षाची तालुकाध्यक्षाच्या विरोधात तक्रार

भाजपात जनसंग्रह असलेल्यांना डावलल्याबाबत असंतोष खदखदत असताना आता भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षांनी चक्क तालुकाध्यक्षाविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी मानोरा तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण यांच्या विरोधात अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांचे अर्थसहाय्य राजकीय सुडबुद्धीने रखडविल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

Akola
Pune: प्रश्‍न सांडपाण्याचा, प्रदूषण जोरात, प्रकल्पांचे आराखडे मंजुरीच्या प्रतीक्षेत; उपाय संथ

राजकीय आकसापोटी मौजा पोहरादेवी येथील ३०९ लोकांचे अर्थसहाय रखडले आहे. तहसीलदारांनी येत्या चार दिवसात पोहरादेवी येथील नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना पैसे चेकद्वारे वाटप न केल्यास ता. २८ ऑगस्ट रोजी विजय अनंतकुमार पाटील, जिल्हापरिषद सदस्य स्वाती अजय पाटील व इतर नुकसानग्रस्त लाभार्थी सामुहिक आत्मदहन करणार असल्याची तक्रार मानोरा पोलिसात देण्यात आली.

तालुकाध्यक्ष ठाकूरसिंग चव्हाण यांनी मी अद्यापही तक्रार पाहिली नसून जर माझ्या विरोधात विजय पाटील यांनी तक्रार दिली असेल तर ते माझे नेते आहेत त्यांनी जेव्हा आंदोलन केले तेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो आणि मी कोणत्याही व्यक्तीला शिवीगाळ केली नाही.

याबाबत मी तहसीलदार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सध्या चेक बुक नाही त्यामुळे त्याचे धनादेश थांबले आहेत, अशी प्रतिक्रीया दिली.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.