Akola News : अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे डॉ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीतर्फे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अर्ज सादर केला. यावेळी दोन्ही पक्षाकडून शहरातील प्रमुख मार्गाने शक्तीप्रदर्शनही करण्यात आले.
काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही उपस्थिती दर्शवून सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला. नाना पटोले म्हणाले, २०१४ आणि २०१९ या दहा वर्षाच्या कालावधीत मतांचं मोठं विभाजन झालं. फुले-शाहू-आ़बेडकरांच्या महाराष्ट्रात मतांचं विभाजन कसं करता येईल हे भाजपचं षडयंत्र होतं. असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी आंबेडकरांना लगावला.
अकोल्याचे भाजप खासदार सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. हे लोक त्यांचं व्हेंटीलेटर कधी काढणार हे सांगता येत नाही. कदाचित निवडणुकीतच काढतील असा शंकाही नाना पटोलेंंनी उपस्थित केली. माझ्या पोटनिवडणुकीत आंबेडकरांनी उमेदवार दिला. मी भाजप सोडलं तेंव्हापासून प्रकाश आंबेडकरांनी माझा राग करणं सुरू केल्याचेही ते म्हणाले.
काही अकोल्यात हवा उडवण्यात आली की डॉ. अभय पाटलांची उमेदवारी मागे घेणार. पण मी सांगतो की असं होणार नाही असेही पटोलेंनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसच्या इतरही नेत्यांची भाषणे झाली. सभेला खा.चंद्रकांत हंडोरे, आमदार अमीत झनक, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, प्रकाश तायडे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, शहराध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे, डॉ. झिशान हुसेन आदी उपस्थित होते.
कोणताच उमेदवार कोणत्याही जातीचा नसतो. हे लक्षात घ्या. आम्ही कोणतीही जातपात मानणारे नाही. कोणताही भेदभाव करीत नाही. काँग्रेसची परंपरा ही सर्वधर्म समभावाची आहे. काँग्रेसने नेहमी सर्वसामान्यांना महत्व दिले आहे. विकास कार्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू असा विश्वास व्यक्त करीत एकदा संधी द्या असे आवाहन काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी सभेत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.