Akola Loksabha Election : अकोला लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची शक्यता

विकासकामे न केल्याचा बसणार फटका?
abhay patil, anup dhotre, prakash ambedkar
abhay patil, anup dhotre, prakash ambedkarsakal
Updated on

अकोला - अकोला लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. मागील चार निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता या मतदारसंघात कायम ठेवण्यात खासदार संजय धोत्रे यांना यश आले. मात्र यावेळेस महायुतीच्या उमेदवाराला जबरदस्त फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून यंदा परिवर्तनाला संधी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजपचे संजय धोत्रे यांनी २००४, २००९, २०१४, २०१९ अशा चार निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळविला. मात्र, २०२४ च्या यंदाच्या निवडणुकीत प्रकृती ठीक नसल्याने त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे रिंगणात उतरले. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे डॉ. अभय पाटील व वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर मैदानात आहेत. अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनदा अकोल्यात येऊन गेले.

प्रचारादरम्यान अनुप धोत्रे यांना प्रचंड रोषाचा सामना करावा लागला. शिवाय माजी आमदार नारायणराव गव्हाणकर व माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कितपत काम केले हाही प्रश्न आहे. दुसरीकडे काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांची जमेची बाजू अशी आहे की, त्यांनी मराठा मोर्चाचे नेतृत्व केले होते.

त्यामुळे जिल्ह्यातील ९० टक्के मराठा पाटील, कुणबी व देशमुख समाज त्यांच्यासोबत होता. शिवाय सहकार लॉबीतील नेतेही त्यांच्या सोबत प्रचारादरम्यान होते.

शरद पवार यांनी स्वतः स्थानिक नेत्यांशी संवाद साधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. रिसोड मतदारसंघात प्रामुख्याने भाजप उमेदवाराला खुला विरोध झाला. त्याठिकाणी ज्येष्ठ नेते अनंतराव देशमुख यांचाही फारसा प्रभाव दिसून आला नाही. त्यामुळे याही मतदारसंघातील बहुसंख्य असलेला मुस्लीम समुदाय हा काँग्रेस उमेदवाराच्या मागे गेला. अकोला पूर्व मतदारसंघ वगळता भाजप उमेदवाराला जास्त पाठिंबा मिळू शकला नसल्याची वास्तविकता आहे.

सहकार लॉबी कुणाकडे?

सहकार लॉबीची मते ही निर्णायक ठरणार आहेत. ही लॉबी कुणाच्या पाठीमागे जाते यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. अकोला लोकसभा मतदार संघात १९८४ पासून झालेल्या १० लोकसभा  निवडणुकीत ॲड. आंबेडकर निवडणूक रिंगणात होते. तिरंगी लढतीत त्यांना आठ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यावर ॲड. आंबेडकर विजयी झाले होते. सरळ लढतीत १९९८ साली आंबेडकर केवळ ३२,७८२ एवढ्या कमी मताधिक्याने विजयी झाले होते.

गव्हाणकरांची भूमिका महत्त्वाची

या मतदारसंघात तीन लाखांपेक्षा अधिक कुणबी मतदार असल्याचा अंदाज आहे. ४० वर्षाआधी भाजपचे उमेदवार भाऊसाहेब फुंडकर यांना मिळालेली दीड लाख मते कुणबी समाजाची होती. ४० वर्षानंतर या मतांमध्ये दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

निकालावर परिणाम करणारे घटक

  • बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर व माजी मंत्री डॉ. रणजित पाटील यांची रणनीती

  • मुस्लीम समुदायाचे गठ्‍ठा मतदान कुणाच्या पारड्यात?

  • खारपाणपट्‍यातील शेतकऱ्यांसमोरील समस्या

  • अकोला-अकोट रस्त्याचे प्रलंबित काम

  • एमआयडीसीतील उद्योजकांसमोरील समस्या

  • मोदी फॅक्टरचा प्रभाव दिसला नाही

  • विद्यमान खासदारांविषयी प्रचंड रोष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.