Loksabha Election Voting : अखेर त्या 300 कामगार कुटुंबियांचे मतदान; 'सकाळ डिजिटल'चा IMPACT

अकोल्यात 70 कामगार कुटुंबियांकडून घेण्यात आलेला मतदानावर बहिष्कार आता मागे घेण्यात आला.
Collector Ajit Kumbhar
Collector Ajit Kumbharsakal
Updated on

अकोला - अकोल्यात 70 कामगार कुटुंबियांकडून घेण्यात आलेला मतदानावर बहिष्कार आता मागे घेण्यात आला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचा निरोप घेऊन अकोला शहराचे तहसीलदारांनी या कामगार कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी बिर्ला कॉलनी इथं पोहचले होते आणि त्यात ते यशस्वी झाले.

अकोला शहरातील बिर्ला कॉलनीतील 70 कामगार कुटुंबीयांनी अकोला लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकला, आता हा बहिष्कार मागे घेतला. आता जवळपास 70 कुटुंबातील तीनशे जण मतदान करणार आहेत. सकाळ डिजिटल ने बिर्ला कॉलनीतील कामगारांचा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर मांडला. त्यामुळे या लोकांनी मतदानासाठी पुढाकार घेतला.

नेमके काय झाले होते 

या कामगारांच्या 70 कुटुंबांना प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस दिल्यावरून त्यांनी उपोषण पुकारले होते. मात्र अद्यापही तोड़गा नाही निघाली, अखेर या 70 कामगार कुटुंबीयांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला. तब्बल 300 हुन अधिक मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. 

'सकाळ'चा पुढाकार 

बिर्ला कॉलनीत मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळताच सकाळ माध्यम समूहाची टीम त्या ठिकाणी पोचली कामगारांचा प्रश्न प्रशासनासमोर मांडला एवढेच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांशी कामगार कुटुंब यांचे बोलणे करून दिले. अवधीतच तहसीलदारांना त्या ठिकाणी पाठवून ऐन वेळी दखल घेत सर्वांचे समजूत काढली. त्यावर तोडगा काढण्याच आश्वासन दिले त्यानंतर मतदान न करण्याचा अखेर निर्णय मागे घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.