अकोला : उन्हाळी बिजोत्पादन कार्यक्रम निष्फळ!

महाबीजचे २५ हजार हेक्टरवर केवळ १५ हजार क्विंटल सोयाबीन बिजोत्पादन
soybean seeds Production
soybean seeds Productionsakal
Updated on

अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन बिजोत्पादनाच्या उद्देशाने उन्हाळी बिजोत्पादन कार्यक्रम जवळपास २५ हजार १६१ हेक्टरवर राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या बिजोत्पादन कार्यक्रमातून केवळ १५ हजार क्विंटल सोयाबीनचे कच्चे बियाणे महाबीजला प्राप्त झाले असून, त्यापैकी तुर्तास केवळ ४०० क्विंटल बियाणे पास झाल्याची माहिती महाबीजच्या प्रोडक्शन विभागाकडून मिळाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका बसून राज्यातील सोयाबीन पीक उत्पादनात घट झाली असून, गुणवत्ता सुद्धा ढासळत आहे. त्यामुळे सोयाबीनचे गुणवत्तापूर्ण व मुबलक बियाणे उपलब्धतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे राज्यभरात २५ हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन बीज उत्पादन प्रोग्राम राबवित असल्याचे व एप्रिल-मे पर्यंत जवळपास एक लाख ६५ हजार क्विंटल बियाणे उत्पादीत होण्याची अपेक्षा महाबीजच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कळविले होते.

या अपेक्षेची पूर्ती झाल्यास निश्‍चितच खरिपात सोयाबीन बियाणे उपलब्धतेचा प्रश्‍न निकाली काढता आला असता. मात्र, या बिजोत्पादन कार्यक्रमातून केवळ १५ हजार क्विंटल सोयाबीनचे कच्चे बियाणे महाबीजला प्राप्त झाले असून, त्यापैकी आतापर्यंत केवळ चारशे क्विंटल सोयाबीन बियाणे पास झाले आहे.

उन्हाळी बिजोत्पादनातील सोयाबीन वाण

महाबीजद्वारे राबविण्यात आलेल्या उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रमात प्रामुख्याने दहा वर्षाआतील वाण, जसे फुले संगम, फुले किमया, एमएयूएस ६१२ व इतर प्रचलित वाण, जसे जेएस ९३०५, एमएयूएस १५८, एमएयूएस १६२, एमएयूएस ७१ इत्यादी वाणांचा समावेश होता.

असा होता बिजोत्पादन कार्यक्रम

राज्यात प्रामुख्याने अकोला विभागात पाच हजार ५४८ हेक्टरवर, परभणी विभागात सहा हजार ९९७ हेक्टरवर, जळगाव विभागात तीन हजार १८५ हेक्टरवर, जालना विभागात चार हजार २४७ हेक्टरवर, नागपूर विभागात दोन हजार ३८८ हेक्टरवर तर, पुणे विभागात दोन हजार ७९६ हेक्टरवर, असा एकूण २५ हजार १६१ हेक्टरवरील उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन कार्यक्रम महाबीजद्वारे कळविण्यात आला होता.

आर्द्रता व व्हायरल अटॅक

उन्हाळी बिजोत्पादन कार्यक्रम राबविताना अधिक तापमानामुळे सकस व बियाणे मापकानुसार आवश्‍यक मॉइश्‍चर बिजोत्पादक शेतकऱ्यांना साधता आले नाही. काही भागात विषाणुजन्य रोगाचा प्रादूर्भाव सोयाबीनवर आढळल्याने तेथील संपूर्ण बियाणे आधिच रद्द करण्यात आले. अपेक्षेच्या तुलनेत मोठी घट उत्पादनात दिसून आले. त्यामुळे राबविल्या कार्यक्रमातून अपेक्षित सोयाबीन बिजोत्पादन झाले नसून, केवळ १५ हजार क्विंटल कच्चे सोयाबीन बियाणे प्राप्त झाले व त्यापैकी आतापर्यंत केवळ ४०० क्विंटल बियाणे पास झाल्याची माहिती महाबीजच्या प्रोडक्शन विभागाद्वारे देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.