नवलंच की, आता निवडणूकीच्या मानधनासाठी होणार ‘बौंबाबोंब’

Akola Marathi grampanchyat News Agitation for Gram Panchayat election honorarium
Akola Marathi grampanchyat News Agitation for Gram Panchayat election honorarium
Updated on

अकोला :  जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणूक प्रक्रियेत विविध सरकारी विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या हौसेने सहभागी झाले हाेते. मात्र, असं असलं तरी त्यांना अजूनही त्यांच्या कामाचं मानधन मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला असून आंदोलनही अजब-गजब आहे. मानधनासाठी ते आता बोंबाबोंब करणार आहेत.

 जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान तर १८ जानेवारी रोजी मतमोजणीची प्रक्रिया सुध्दा पार पडली. त्यानंतर निकालही जाहीर करण्यात आला.

मात्र, या प्रक्रियेसाठी विविध विभागांतील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया संपली असून कर्मचारी, अधिकारी मात्र अजूनही मानधनापासून वंचित आहेत.

त्यामुळे याबाबत फुले आंबेडकर विद्वत सभेने प्रशासनाला विनंती केली आहे. यात संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय आठवले, प्रा. सुरेश मोरे, महासचिव प्रा. डॉ. संतोष पेठे, प्रा.डॉ. बाळकृष्ण खंडारे, निरंजन वाकोडे, मंदा सिरसाट, प्रभाकर कवडे, उज्ज्वला नरवाडे, रेखा चव्हाण, कल्पना महाले, लीला सहस्त्रबुद्धे, कल्पना महाले, वर्षा जंजाळ, प्रमिला गवई इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते.

हेही वाचा -प्रेमात आंधळा झालेल्या प्रियकरचा असाही प्रताप, धक्कादायक पाऊल उचलल्याने पोलिसांच्याही डोक्याला ताप

मानधन न दिल्यास निवडणूक कामावर बहिष्कार
कोरोना महमारीच्या काळात स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता निवडणुकीच्या राष्ट्रीय कार्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून निवडणूक प्रक्रियेतील कर्तव्य पार पडले. मात्र आता मानधन देण्याबाबत प्रशासनाने चुप्पी साधली आहे. त्यामुळे मानधन तातडीने न दिल्यास निवडणूक कार्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा विद्वत सभेने दिला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.