बातमी वाऱ्यासारखी पसरली; ऐंशी फुट खोल विहिरीत घडलं काय?

Akola Marathi News Balapur taluka Satargaon bibat fell in the well in the farm
Akola Marathi News Balapur taluka Satargaon bibat fell in the well in the farm
Updated on

बाळापूर (जि.अकोला)  : बाळापूर तालुक्यातील सातरगाव येथील शेतकरी अजयसिंग चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत एक बिबट आढळून आला. सोमवारी सकाळच्या सुमारास काही शेतकरी शेतात गेले असताना ऐंशी फुट खोल असलेल्या विहिरीत बिबट पडला असल्याचे  दृष्टीस पडले.

विहीरीत तीस फुटांपर्यंत पाणि असल्याने विहीरतील उंच ओट्यावर बिबट्याने आसरा घेतला होता. विहिरीत बिबट पडल्याची माहिती परीसरात वाऱ्यासारखी पसरताच गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

हेही वाचा - बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

वनविभागाच्या अधीकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. दुपारच्या सुमारास वनविभागाचे वनसंरक्षक अधिकारी शेतशिवारात दाखल झाले. पाण्यात पडल्यामुळे हा बिबट्या थंडीने चांगलाच कुडकूडला होता.

बराच वेळ उलटून गेला तरी वनविभागाने बिबट्याला पाण्यातून बाहेर काढण्याची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी वनविभागावर नाराजी व्यक्त केली. अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा विहीरीत सोडला.

हे अवश्य वाचा -  21 वर्षांत चार नाही तर चौदा झालेत सरपंच 

त्यानंतर अथक परिश्रमानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. भक्ष्याच्या मागे पळत असलेल्या बिबट्याला विहिरीचा अंदाज न आल्याने हा बिबट्या विहिरीत अचानकपणे कोसळला.

हे वाचलं का?  - सावधान तुमची होऊ शकते फसवणूक! महिलेला गुगलवर सर्च करणे पडले दोन लाखांत

साधारणतः एक ते दीड वर्ष वयाचा हा बिबट्या असावा,असा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, या परिसरात बिबट्याचे मोठे वास्तव्य असून वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.