डोणगाव (जि.बुलडाणा) : सध्या दारू किंवा पारंपरिक नशेच्या सामग्री शिवाय इतर कित्येक प्रकारचा नशा युवा वर्गात प्रचलित होत आहे. यात खोकल्यासाठी वापरली जाणारी औषधी, झोपेच्या गोळ्या, ऍलर्जी साठी वापरल्या जाणार्या गोळ्या अशा औषधी वापरून नशा केला जात आहे.
ज्याने कमी वेळात नशा व तोंडाचा सुद्धा वास येत नसल्याने युवा वर्गात अशा प्रकारे नशा करण्याचे प्रमाण वाढले. अशातच डोणगाव येथे गोहगाव रोडवर फेकलेल्या वैद्यकीय जैविक कचर्यात इतर कचर्यासोबत एका विशिष्ट प्रकारच्या औषधाच्या शेकडो बाटल्या पडलेल्या आढळल्या. तो जैविक कचरा फेकणारा व्यक्ती ड्रग्ज अडीक्ट असू शकतो किंवा नशेसाठी औषधी पुरवणारा असू शकण्याची चर्चा गाव भरात सुरू आहे.
डोणगावात रस्त्यालगत औषधाचा आणि तेही मेडीकल फिल्डमध्ये अत्यंत जोखमीचे खोकल्यावर वापरले औषधी जैविक कचर्यामध्ये सापडल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे. गोहगाव रस्त्यानजीक फेकलेल्या त्या जैविक कचर्यात शेकडोंच्या संख्येत खोकल्याची औषधी आहे. त्या रिकाम्या बाटल्या दिसून येत आहे. शेकडो बाटल्या एकाच ठिकाणी जैविक कचर्यासोबत रिकाम्या करून फेकणारा ती व्यक्ती कोण आता हा चर्चेचा विषय बनला आहे.
एकीकडे त्या ठिकाणी सिरीनज, इंजेक्शन, इंजेक्शनसाठी वापरल्या जाणार्या औषधांच्या बाटल्या असा कित्येक जैविक कचर्यासोबत नशेसाठी वापरल्या जाणार्या बाटल्या पडलेल्या आहे. त्यामुळे सदर औषधी बाटल्या संख्येवरून कोणी डॉक्टर स्वतःहा नशा करतो की नशा करणार्या लोकांना औषधी पुरवतो असा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरीकडे कित्येक बोगस डॉक्टर सुद्धा ग्रामीण भागात आपली दुकानदारी थाटून बसलेले असून, ते तर नशेची औषधी विकत नसतील ना असा प्रश्न निर्माण होत आहे.
त्या औषधासाठी जटिल कार्यप्रणाली
एका खास असलेली खोकल्याची औषधी ही रजिस्टर प्रॅक्टीसनर असलेला डॉक्टर ज्यांच्या हॉस्पिटलची मुंबई नोंदणी अधिनियम कायद्यानुसार नोंदणी झालेली आहे तेच डॉक्टर लिहू शकतात. औषधी दुकानदार ज्याच्याकडे औषधी घेतली त्या दुकानदाराला संबंधित डॉक्टर ज्यांनी औषधी लिहून दिली. त्या चिट्ठीची झॅरोक्स आपल्या जवळ ठेवावी लागते अशी किचकट प्रक्रिया पार पडल्यानंतर खास असलेली औषधी द्यावी लागते. मात्र, गोहगाव रोडवर शेकडोंच्या संख्येत पडलेल्या त्या बाटल्या कशा काय ? त्यांना कोणते नियम नाही का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
जैविक कचरा बाहेर फेकणे चुकीचे आहे. गोहगाव रोड वरील जैविक कचर्याची चौकशी होणे गरजेचे आहे. औषधाच्या बॅच नंबर वरून त्याचा तपास लागू शकतो तसेच येथील काहीच डॉक्टरांचे जैविक कचरा नेणार्या कंपनी सोबत करार झालेले नाही. बहुतांश डॉक्टरांकडून जैविक कचरा नेला जातो.
- डॉ. अनंत क्षीरसागर, अध्यक्ष,डॉक्टर असोसिएशन, डोणगाव.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.