अकोला : 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतल्यानंतर कुणालाही आंतरराष्ट्रीय संस्थेत मानाची आणि लठ्ठ पगाराची नोकरी मिळते हे वेगळे सांगायला नको. अशाच नामी संधी पायाशी आलेल्या असतानाही लठ्ठ पगाराच्या नोकरीकडे पाठ फिरवून रोहनने ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा धाडसी निर्णय घेतला. हेही वाचा आमदार अमोल मिटकरी यांच्या गावात ग्रामस्वराज्य पॅनलचा उधळला गुलाल या गावातूनच त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. धाबा गावातील ग्रामपंचायत सदस्य ते आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली. ते धाबा गावात उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे सभापती झाले. यानंतर कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून ते विधानसभेवर निवडून गेले. आता आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत रोहन सुनील धाबेकर या तरूणाने धाबा ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून निवडून येण्याची कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, तो उच्च शिक्षित असून, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी आहे. हेही वाचा शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या मदाणी ग्रामपंचायतवर फडकविला झेंडा जगविख्यात महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रख्यात अर्थतज्ञ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग जगप्रसिद्ध अर्थतज्ञ शिकले, त्या ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये शिकलेला विद्यार्थी सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायतचे निकालात धाबा ग्रामपंचायत सदस्य बनला आहे. हा विद्यार्थी म्हणजे रोहन सुनील धाबेकर होय. रोहनचे आजोबा स्व. बाबासाहेब धाबेकर याच ग्रामपंचायतमध्ये १९२७ साली सदस्य म्हणून निवडून आले होते. व या पदापासूनच त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. हेही वाचा मतदारराजाची युवकांना पसंती, तेल्हारा तालुक्यात परिवर्तनाची लाट
सोमवारी जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालात सुनील धाबेकर गटाचे सर्व नऊ सदस्य बहुमताने विजयी झाले आहेत. हेही वाचा अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा याविषयी उमेदवारांपैकी रोहन एक उमेदवार आहे. एवढ्या मोठ्या विश्वविख्यात विद्यालयात शिकलेला विद्यार्थी आता धाबा ग्रामपंचायतमध्ये कोणती कामगिरी बजावतो याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (संपादन - विवेक मेतकर) | |||
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.