बार्शिटाकळी (जि.अकोला) : येथील दिवानी व व फौजदारी न्यायालयात मध्यरात्री न्यायालयाच्या मुख्य दरवाजांचे कुलूप तोडून चोरांनी केला चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबड उडाली.
कुलूप तोडण्याचा आवाज आल्याने रात्रपाळी वर असलेल्या न्यायालयीन कर्मचारी यांनी मुख्य दरवाज्याकडे धाव घेतली असता दोन अज्ञात चोरटे न्यायालयाच्या आत प्रवेश करण्याच्या तयारीत दिसले. रात्रपाळीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आवाज देताच चोरट्यांनी शिवीगाळ करीत तेथून धुम ठोकली.
ड्युटीवर असलेल्या निलेश सदांशिव व मोहन पवार या कर्मचाऱ्याने बऱ्याच अंतरापर्यंत चोरांचा पाठलाग केला असता पाठीमागून येणाऱ्या चालत्या गाडीत बसून चोर पळून गेले.
या घटनेची माहीती रात्रीच न्यायालयाच्या न्यायधिशांना व पोलीस स्टेशनला देण्यात आली व २६ जानेवारी रोजी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली.
पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केल्या नंतर सकाळी ११ ते १२ वाजता दरम्यान अकोला जिल्हा न्यायधीश एन जी खोब्रागडे, व जिल्हा न्यायधीश भालेराव , तसेच बार्शिटाकळी न्यायलयाचे न्यायधीश एम जे शेख, व ठाणेदार प्रकाश पवार यांनी घटना स्थळाची पाहणी केली .
वारंवार येथील न्यायलया मध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांनवर खेद व्यक्त केला. या वेळी श्वान पथक व फिंगर इन्वेस्टीगेशन पथकाला सुद्धा प्रचारण करण्यात आले होते.
श्वान पथकाचे राजीव चौधरी व भारत ठाकूर यांनी या भागाची पाहणी केली असता काही आढळून आले नाही, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड मोहसीन खान , अॅड विनोद राठोड सह इतर वकील मंडळी व न्यायलयीन अधिकारी कर्मचारी हे सुद्धा हजर होते.
घटनास्थळाचा पंचनामा करून फिर्यादी च्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .पुढील तपास ठाणेदार प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेंद्र जोशी शरद सावळे ज्ञानेश्वर गीते हे करीत आहेत.
या आधीही झाले होते चोरीचे प्रयत्न
बार्शिटाकळी तालुक्याचे ठिकाण असून येथील दिवानी व फौजदारी न्यायालयात या आधी सुद्धा दिनांक ४ डिसेबर २०१९ च्या मध्य रात्री अज्ञात चोरांनी न्यायालयाचे दरवाज्याचे कुलुप तोडून आत प्रवेश करीत आतील न्यायालयीन दस्तावेज असलेल्या अलमाऱ्यांचे व कपाटाचे कोंडे तोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला होता .
त्या घटने ला एक वर्षाचा कालावधी पुर्ण झाला. मात्र त्या घटने चा कोणत्याच प्रकारचा तपास व चोरांचा ठाव ठिकाणा लागला नाही .
असे प्रकार पुन्हा पुन्हा घडत असल्याने बार्शिटाकळी शहरात न्यायपालीका सुद्धा सुरक्षीत नसल्याने सामान्य नागरीकांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
न्यायालयच का?
असे काय आहे . त्या न्यायलयात की चोर वांरवार चोरीचा प्रयत्न करीत आहे. हे सुद्धा एक कोडं आहे. पोलीसांचा वचक संपल्याने चोरांची हिम्मत वाढली आहे. या मुळे यणाऱ्या काळात चोरीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.