ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

Akola Marathi News Two children gully fight video goes viral on internet
Akola Marathi News Two children gully fight video goes viral on internet
Updated on

अकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का? त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस असलेलं भांडण मजेशीर वाटू लागतं.

अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सध्या फेसबुकवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. यात दोन लहान मुले त्यांच्या गावातील गल्लीत भांडत असून एकमेकांना धमकावत आहे. एकमेकांना मारण्याची भाषा करत आहे. तर दुसरा एकाला शंकरपाळ्या म्हणून शिवी देत चिडवतो आहे.

खरं तर हा व्हिडीओ #शंकरपाळ्या असा हॅशटॅग वापरून लोक त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर करत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ बघाल तर पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला बालपणीच्या तुमच्या अनेक गोष्टी अगदी सहज आठवतील. कारण बालपणी प्रत्येकाचंच कुणासोबत तरी भांडण नक्कीच झालेलं असतं.

नेमका हा व्हिडिओ कुठला आहे हे कळू शकलं नाही. मात्र महाराष्ट्रातील किंवा विदर्भातील ग्रामीण भागातील असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून दिसून येतं.

खेळता खेळता होतं भांडण
यात दोन मुले खेळता खेळता अचानक भांडू लागतात. एकमेकांना धमकावू लागतात.. पण लोकांना यातील सर्वात जास्त आवडलेला डायलॉग व्हिडीओच्या शेवटी आहे. यात एक मुलगा दुसऱ्याला ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई' असं म्हणतो. खरंतर त्यांचं सिरीअस भांडण सुरू आहे. पण हा डायलॉग ज्याप्रकारे एकाने म्हटला आपल्याला हसू कोसळल्याशिवाय राहत नाही. 

डायलॉगबाजीची नेटकऱ्यांना भुरळ
व्हिडिओतील ही दोन्ही मुले लहानच आहेत. पण त्यांची भांडणाची स्टाइल लोकांना चांगलीच आवडली आहे. इतकेच काय तर त्यांचे फोटो आणि डायलॉग वापरून सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. दोघेही एकमेंकाना हातही लावत नाही. पण त्यांची डायलॉगबाजी लोकांचं मन जिंकून गेली आहे. खरंच बालपण किती भारी असतं ना?

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()