Gram Panchayat Result : मतदारराजाची युवकांना पसंती, तेल्हारा तालुक्यात परिवर्तनाची लाट

Akola Marathi News- Voters love the youth, a wave of change in Telhara taluka
Akola Marathi News- Voters love the youth, a wave of change in Telhara taluka
Updated on

तेल्हारा (जि.अकोला) : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये मतदार राजाने यावेळेस मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडवून आणल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीत उतरलेल्या युवा उमदारांना मतदारांनी गावगाड्याचा कारभार चालविण्याची संधी दिली. तालुक्यातील धक्कादायक निकाल म्हणजे, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षांचे पॅनल पराभूत झाले.

याशिवाय विविध राजकीय पक्षांच्या दिग्गजांना मोठा फटका बसला असून, त्यांच्या पॅनला पराभव पत्करावा लागला.

तेल्हारा तालुक्यांमध्ये खेळ सटवाजी व चांगलवाडी या दोन ग्रामपंचायती अविरोध निवडून आले तर ८५ उमेदवार अविरोध निवडून आले होते. त्यामुळे २३५ जागांसाठी ६५४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. सोमवार, ता.१८ जानेवारीला तेल्हारा तहसील कार्यालयावर घेण्यात आलेल्या मतमोजणीमध्ये तेल्हारा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेडच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते.

हिवरखेड मध्ये कोणत्याही एका पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. निवडणुकीत नवखे असलेल्या युवकांना मतदारांनी पसंती दिली आहे. बेलखेड ग्रामपंचायतमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांची सत्ता होती, त्या भाजपचे तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार व सरपंच मोहन गोमासे या दोघांनी मिळून तयार केलेल्या पॅनलला मतदारांनी नाकारले. शिवसेना तालुका समन्वयक बाळासाहेब निमकर्डे यांच्या परिवर्तन पॅनलला नागरिकांनी स्पष्ट बहुमत दिले. भांबेरी येथे मिलिंद भोजने व सागर कौसल यांच्या पॅनलचा पराभव झाला. शिरसोली ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन होऊन निवृत्ती गेंबळ यांच्या पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

वडगाव रोठे येथे चंदू बोरसे व विष्णू रोठे यांच्या पॅनलने बाजी मारली. खंडाळा ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती सदस्य किशोर मुंदळा यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. अडगाव बु. ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन होऊन येथे संजय राजनकर यांच्या पॅनलने बाजी मारली आहे.

शिवाजीनगर ग्रामपंचायतमध्ये विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संगीता अढाऊ यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. आरसुळ ग्रामपंचायतमध्ये नागळे-हेलगे-नवलकर पॅनलने आपली सत्ता कायम ठेवली. सौंदळा ग्रामपंचायतमध्ये मिरगे-अरबट व त्यांच्या सहकाऱ्यांचे पॅनल विजयी झाले. राहणे पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला. दानापूर ग्रामपंचायतमध्ये एकाही पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले नसून, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य यांच्या पॅनेलला सुद्धा चार जागा मिळाल्या आहेत.

कार्ला ग्रामपंचायतमध्ये चांदूरकार-पोटे- शेगोकार यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. वाडी आदमपूर येथे रुपेश राठी यांच्या पॅनेलने सर्वाधिक जागा मिळविल्या. त्यांना सरपंच बनविण्याकरिता एक-दोन मतांची जरुरत पडणार आहे. वाकोडी ग्रामपंचायतमध्ये प्राध्यापक शेतकरी नेते प्राध्यापक सुधाकरराव येवले यांच्या ग्राम विकास पॅनल ने ७ पैकी ६ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला.

ईसापूर ग्रामपंचायत येथे परिवर्तन झाले असून, येथे वारूळकर-नागे- घाटोळ पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. गोर्धा , हिंगनी बु. रायखेड, वरुड बु. राणेगाव जास्त गाव , थार ,तुदगाव , जस्तगाव, तळेगाव वडनेर , खेल देशपांडे , नर्सिपूर , नेर , पिवंदळ या ग्रामपंचायतीमध्ये प्रस्थापितांना हादरे देत मतदारांनी युवकांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले.

घोडेगावात राकाँ तालुकाध्यक्षांना धक्का
घोडेगाव ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन घडवून नाशिर मामू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप ढोले यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव केला. घोडेगाव ग्रामपंचातवर नाशिरमामूंच्या पॅनलचा झेंडा फडकला. अटकळी ग्रामपंचायतमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेश दारोकार यांच्या पॅनलचे पूर्ण पानिपत झाले. येथे वंचितचे युवा नेते अशोक दारोकार व शुद्धोधन दारोकार यांच्या पॅनलने दणदणीत विजय संपादित केला आहे.
 
जिल्हा परिषद अध्यक्षांनी राखली प्रतिष्ठा
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने व भाजपचे युवा नेते लखन राजनकर यांच्या पॅनला मतदारांनी पसंती दिली. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला मिळालेले हे एकमेव यश ठरले.

प्रशासनाकडून चोख व्यवस्था
तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू असतान कोणतेही वाद होऊन नये म्हणून प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश गुरव यांनी काम पाहिले. मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस यंत्रणा तैनात होता. तेल्हारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चोख होता.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()