Akola News : अकोला जिल्ह्यात १७३२ सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना; ३०२ गावात एक गाव एक गणपती; पोलिसांचा तगडा बंदोबस्त

महानगरपालिका हद्दीसह जिल्ह्यात एकूण १७३२ ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली
akola news 1732 ganpati bappa set up in sandals one village, one Ganpati police security
akola news 1732 ganpati bappa set up in sandals one village, one Ganpati police securitySakal
Updated on

अकोला : महानगरपालिका हद्दीसह जिल्ह्यात एकूण १७३२ ठिकाणी सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये ३०२ गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. या उत्सावासाठी शहरासह जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्‍यात आला आहे.

गणेशोत्सव व ईद-ए.मिलाद उत्सव एकाच काळात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनात प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

जिल्ह्यात प्रत्येक पोलिस स्टेशनच्या स्तरावर गणेश मंडळ दत्तक योजना राबविण्यात आली असून, त्यासाठी प्रत्येकी एका पोलिस अंमलदाराकडे एक गणेश मंडळ वाटप करण्यात आले आहे. उत्सव काळात जिल्हाभर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

akola news 1732 ganpati bappa set up in sandals one village, one Ganpati police security
Akola Crime : हुंडीवाले हत्याकांडातील दोन आरोपींना सर्वोच्च न्यायालयातून जामीन

ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजेवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. उत्सव काळात गर्दीच्या ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना घडतात. त्याला प्रतिबंध करण्यासाठी व महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दामिनी पथकामार्फत पेट्रोलिंग सुरू आहे. याशिवाय बीडीडीएस पथकाकडूनही तपासणी करण्यात येत आहे.

असा असेल पोलिस बंदोबस्त

जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान एक पोलिस उपअधीक्षक, १० पोलिस उपनिरीक्षक, एसआरपीएफच्या दोन कंपन्या, २७५ पोलिस अमलदार, ७५० होमगार्ड एवढी पोलिसांची कुमक इतर जिल्ह्यातून मागविण्यात आली आहे. त्यांना बंदोबस्तावर लावण्यात आले आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यातील १५०० पोलिस अंमलदारही तैनात राहणार आहेत. याशिवाय सीसी कॅमेरे व ड्रोनद्वारे निगराणी केली जात आहे. सोशल मीडियावरील पोस्टवर सायबर पोलिसांचे लक्ष आहे.

पोलिस अधीक्षकांकडून मिरवणूक मार्गाची पाहणी

दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. त्यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सोमवारी सायंकाळी अकोला शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा रुट मार्च काढून शक्तीप्रदर्शनही करण्यात आले.

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक कारवाई

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिस अधीक्षकांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यानुसार फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १०७ नुसार १२० गुन्हेगार, कलम ११० नुसार २५ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५, ५६ आणि ५७ अंतर्गत सहा प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. दारुबंदी कायद्यच्या कलम ९३ बी नुसार ४४ कारवाया करण्यात आल्यात. एमपीडीएची एक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()