उमेदवारी अर्जासोबत जात पडताळणीची पोचपावती आवश्यक

Akola News: Acknowledgment of caste verification required along with candidature application
Akola News: Acknowledgment of caste verification required along with candidature application
Updated on

अकोला  :  राज्यातील एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

त्यानुसार आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमीपत्र आणि जिल्हा जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती सादर करावी लागेल.

यासंबंधीचे आदेश राज्य निवडणूक आयोगामार्फत राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना ११ डिसेंबर रोजी पत्राव्दारे देण्यात आले आहेत.

त्यानुसार आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील हमीपत्र आणि जात पडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर केलेल्या अर्जाची पोचपावती घेऊन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()