अकोला ः कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने ग्रस्त आणखी पाच रूग्णांचा गुरुवारी (ता. १) मृत्यू झाला. त्यासह २५८ नवे रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील मृतकांची संख्या ४५८ झाली आहे. त्यासोबतच ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या ५३३९ झाली आहे.
कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. १) १ हजार २७९ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १ हजार १०९ अहवाल निगेटिव्ह तर १७० अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच रॅपिडच्या चाचण्यात ८८ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २५८ झाली आहे. याव्यतिरिक्त पाच रुग्णांचा मृत्यू सुद्धा झाला. त्यात पहिला मृत्यू मुंडगाव ता. अकोट येथील ८६ वर्षीय महिलेचा झाला. तिला १८ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा मृत्यू डाबकी रोड, अकोला येथील ७१ वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. त्याला २४ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. तिसरा मृत्यू तारफैल, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष रुग्णाचा झाला. या रुग्णास ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. चौथा मृत्यू शिवापूर येथील ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास ३० मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. पाचवा मृत्यू गोरक्षण रोड, अकोला येथील ८३ वर्षीय पुरुष रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात झाला. या रुग्णास २१ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. सदर पाच मृत्यूंमुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ४५८ झाली आहे.
------------------------
या भागात आढळले नवे रूग्ण
सकाळी १४९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ४५ महिला व १०४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील अकोट येथील २४, पातूर येथील ९, मोठी उमरी येथील ६, अडगाव, तेल्हारा व जठारपेठ येथील प्रत्येकी ५, बार्शीटाकळी, गोरक्षण रोड व एमआयडीसी येथील प्रत्येकी ४ व जिल्ह्यातील इतर भागातील रहिवाशी आहेत. सायंकाळी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ७ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी येथील चार व इतर भागातील रहिवाशी रूग्णांचा समावेश आहे.
-----------------
६९८ जणांना डिस्चार्ज
जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या ६९८ जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या २२ हजार १६१ झाली आहे.
------------------
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - २७९५८
- मृत - ४५८
- डिस्चार्ज - २२१६१
- ॲक्टिव्ह रूग्ण - ५३३९
(संपादन - विवेक मेतकर)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.