Akola News: खबरदार, अल्पवयीन मुलांना दारू द्याल तर...राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इशारा

State Excise Duty Office: राज्य उत्पादन शुल्क विभागाचा इशारा, पुण्याच्या घटनेनंतर अकोल्यात सतर्कता
sakal
State Excise Duty Officesakal
Updated on

योगेश फरपट

Akola News: पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना मद्य प्राशन करण्यास परवानगी दिल्याने उद्भवलेल्या प्रकरणानंतर अकोल्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. अल्पवयीन मुलांना दारू द्याल तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल असा इशाराही राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोल्याच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी दिला आहे.

यासंदर्भात जिल्हयातील सर्व अनुज्ञप्तीधारकांना दिलेल्या सुचना पत्रात म्हटले आहे की, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांच्या बैठकीतील निर्देशानुसार जिल्ह्यातील कोणत्याही परवाना कक्ष अनुज्ञप्तीधारकांकडुन अल्पवयीन मुलांना मद्यविक्री केली जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी,

sakal
Akola: सचिन कलंत्रेंची बदली रद्द करा, महाबीजच्या संचालकांसह भागधारकांची मागणी

विहीत केलेल्या वेळेतच परवाना कक्ष अनुज्ञप्ती व्यवहाराकरीता चालू ठेवाव्यात, मद्य विक्री करतांना केवळ परवानाधारकासच मद्यविक्री केली जाईल किंवा मद्यविक्री करतांना परवाना अदा केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी, परवाना कक्षामध्ये विक्रीसाठी असलेला मद्यसाठा हा अधिकृत वाहतुक परवान्यावरच प्राप्त करुन घेऊनच विक्री करण्याची दक्षता घ्यावी.

निरीक्षणाचे वेळी अनुज्ञप्तीच्या मंजुर जागेचे मंजुर नकाशे निरीक्षणकामी उपलब्ध करुन दिले जात नाही. आर्थिक वर्षांचे नोकरनामे हे संबंधित निरीक्षक/ दुय्यम निरीक्षक यांचेकडुन वेळेत मंजुर घेतले जात नाहीत. अनुज्ञप्ती उघडण्याच्या व बंद करण्याच्या वेळा कटाक्षाने पाळल्या जात नाहीत.

निरीक्षक / दुय्यम निरीक्षक हे अनुज्ञप्तीचे निरीक्षण करीत असतांना अनुज्ञप्तीधारक त्यांना सहकार्य करीत नाही. अनुज्ञप्तीचा अभिलेख सुध्दा निरीक्षणकामी सादर केला जात नाही, ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याचे अधीक्षकांनी म्हटले आहे.

sakal
Akola Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात कर्मचारी जखमी; नळगंगा धरणानजीकच्या रोपवाटिकेतील घटना

तो प्रकार गैरवर्तनाचा

आयुक्तांच्या निर्देशानुसार २५ जूनरोजी हॉटेल रजत बार ॲन्ड रेस्टॉरन्ट या परवाना कक्ष अनुज्ञप्तीचे निरीक्षण केले असता अनुज्ञप्तीधारकाने निरीक्षणकामी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही.

उलट सदर घटनेनंतर अकोला जिल्हा बार ॲन्ड बीअर बार असोसीएशनने अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अकोला तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे अवैध मद्यविक्री तसेच अवैध धाबेसंदर्भात कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल करीत ठिय्या आंदोलन केले. हा प्रकार गैरवर्तनाचा दिसून येतो. ही अत्यंत गंभीर स्वरुपाची असून कठोर कार्यवाहीस पात्र ठरते.

तर होईल कारवाई

सर्व प्रकारच्या अनुज्ञप्तींवर नियंत्रणासाठी सखोल निरिक्षण करणे, अवैध मद्यविक्री होणार नाही व विषारी मद्य पिवून विषबाधा होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी वेळोवेळी निरिक्षण होणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी नेहमीच आडकाठी आणली जाते. अवैध मद्यविक्री, अवैध धाब्याला आळा घालण्यासाठी येणाऱ्या काळात मोहिम राबवल्या जाणार आहेत. तरी अनुज्ञप्ती धारकांनी सुचना व नियमांचे काटेकोर पालन करावे. अनुचित प्रकार व कायद्याचे उल्लंघन झाल्यास अनुज्ञप्ती निलंबनाची तसेच कायमस्वरुपी रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही अधीक्षक सीमा झावरे यांनी दिला आहे.

sakal
Akola ACB : बार NOC साठी सव्वा लाखाची डिमांड; पोलिस पाटील ACB च्या जाळ्यात, ग्रामसेविका फरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.