अकोला ः यावर्षी जिल्ह्यात जून ते ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे ३८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. परंतु सदर क्षेत्रापैकी सर्वाधिक नुकसान मूग पिकाचे आहे. अतिवृष्टीने ३० हजार ६५६.४१ हेक्टर क्षेत्रावरील मूग नेस्तनाबूत झाला. त्यामुळे मूग उत्पादक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मूग उत्पादकांना बसला असला तरी यावर्षी मूगावर व्हायरसने सुद्धा हल्ला केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्यात यावर्षी मॉन्सूनचे ११ जूनरोजी आगमन झाले. त्यानंतर सुद्धा जिल्ह्यात पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे धरणांची पाणीपातळी तळ गाठत होती. या स्थितीमुळे जिल्हावासियांना पेयजल संकटाला सुद्धा सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु सदर स्थितीनंतर तब्बद दीड महिन्यानंतर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली.
त्यामुळे पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला. परंतु नंतरच्या काळात मात्र पावसाने रौद्र रूप दाखवले. त्यामुळे सर्वत्र मूसळाधार पाऊस झाला. सततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले. कपाशीचे बोंड काळे पडले, पावसाच्या माऱ्यामुळे तुरीचे पीक जमिनीवर झुकले.
शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीनसह उडीद व मूग पिकांची पाने पिवळी पडली. काही ठिकाणी तर पाण्याचा निचरा न झाल्याने पिक सडल्याचे प्रकार सुद्धा घडले. त्यामुळे नुकसानीचे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहाय्यकांनी संयुक्त पंचनामे केले. त्यामध्ये जिल्ह्यातील १ हजार १६ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून ४९ हजार ८३५ शेतकऱ्यांच्या ३८ हजार ४६३.५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. नुकसानग्रस्त क्षेत्रापैकी सर्वाधिक नुकसान मूगाचे झाले असून ३० हजार ५६५.४१ हेक्टरवरील मूग पीक अतिवृष्टीमुळे नेस्तनाबूत झाल्याचा उल्लेख संयुक्त अहवालात करण्यात आला आहे.
अडीचशे हेक्टर क्षेत्र गेले खरडून
जून ते ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे २६६.६५ हेक्टर शेती क्षेत्र खरडून गेले. त्यामध्ये बाळापूर तालुक्यातील २६१.५२ हेक्टर क्षेत्र व पातूर तालुक्यातील ५.१३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. बाळापूर तालुक्यातील क्षेत्र खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे ९८ लाख सात हजार रुपये व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे १ लाख ९२ हजार ३७५ रुपयांचे नुकसान झाले. संबंधित शेतकऱ्यांना प्रती हेक्टर ३७ हजार ५०० रुपये प्रमाणे शासनाकडे नुकसान भरपाई मागण्यात येईल.
असे झाले तालुका निहाय नुकसान
तालुका | सोयाबीन | कापूस | तूर | मूग |
अकोला | 0 | 0 | 0 | ७७७.६६ |
तेल्हारा | 0 | 0 | 0 | ४६०७ |
बाळापूर | १०९४.०६ | ११६८ | ३४२.४७ | ६१९१.७८ |
पातूर | 0 | 0 | 0 | १४२३.३३ |
अकोला | १५७०.६ | १४५६.६ | १००.५४ | ५८६८.६१ |
बार्शीटाकळी | 0 | 0 | 0 | १६७१ |
मूर्तिजापूर | ३८०.२१ | १८८.८५ | १००.५४ | ३०२६.०३ |
एकूण | ३०४४.८७ | २८१३.४ | ६४०.६८ | ३०५६५.४१ |
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.