खडसेंच्या फार्म हाऊसवर पक्षप्रवेश; वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादीत दाखल

Akola News: Former District President of Vanchit admitted to NCP at Khadses farm house
Akola News: Former District President of Vanchit admitted to NCP at Khadses farm house
Updated on

बुलडाणा  ः वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र एन. जैन यांनी काही पदाधिकारी व कार्यकर्त्यासह माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


मुक्ताईनगर येथे खडसे यांच्या मुक्ताई फार्म हाऊसवर वंचितचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र एन. जैन, विधानसभा क्षेत्र प्रमुख मधुसूदन सपकाळ, जिल्हा उपाध्यक्ष अमोल इंगळे, नारायण कुयटे आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हाध्यक्ष जितेंद्र एन. जैन यांनी विधानसभा निवडणुकीनंतर वंचितच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तदनंतर आठवडाभरापूर्वी वंचितच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन त्यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. गत विधानसभा निवडणुकीत जिल्हाध्यक्ष जितेंद्र एन. जैन यांच्या नियोजनात बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित आघाडीचा उमेदवार ४२ हजाराच्या वर मतदान घेत स्पर्धेत आला होता. आता जिल्हाध्यक्ष जैन यांनी वंचितची साथ सोडल्याने साहजिकच राजकीय समीकरण बदलणार आहे .


प्रवेश घेणारांमध्ये निलेश टोंगळे, सोपान सपकाळ, शंकर उबाळे, संतोष पाटील, ओंकार वराडे, तुकाराम उबाळे, शुभम बोरसे, लक्ष्मण पवार, योगेश सांगळे, अंकुश लहासे, संतोष गोरे, विशाल घोडेस्वार, नारायण नाईक, सुरेन्द्र नाईक, गणेश थिगळे, विनोद साबळे, संजय भालेकर, पंकज बस्सी, कैलास बस्सी, किशोर पडवाळ, नरेश बस्सी, नरेंद्र बस्सी, दीपक भोकन, कृष्णा चोपडे, शेखर पाटील, भुषण वानखडे, पृथ्वी राजपूत, विश्वपाल परमार, कैलास जाधव, जयसिंग जाधव, अनंता सोनागे, तुळशीराम उबाळे, संजय गिराळ, रमेश शिवणेकर,

बाबुराव वाकोडे, प्रमोद तोमर, रामरतन उकार्ड, दशरथ जाधव, प्रथमेश शिराळ, ईसाकभाई मुनाफ पटेल, शे.अफसर शे. रज्जाक उर्फ राजु मेंबर, शे. सादिक शे. करामत, साजिद वहाब पटेल, वसंत जगताप याप्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांचा समावेश होता. याप्रसंगी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, शहादा माजी आमदार उदेसिंग पाडवी, डॉ तुषार सनांसे, माधव पाटील, विलास धायडे, अनिल वराडे, नीलेश भाऊराव पाटील, शिवराज पाटील, बापू ठेलारी, राहुल पाटील, अभय देशमुख, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()