पती म्हणतो पत्नीने दिली जीवे मारण्याची सुपारी, पण पत्नीऐवजी मुलीने प्रियकरासोबत रचला होता कट
मंगरुळपीर (जि.वाशीम) : मुलीच्या वडीलांनी पोलिसात आपल्याच पत्नीचे पवनसोबत अफेअर असल्याची माहिती दिली. `तु लोहारा येथे ये तुला अधिक माहिती देतो` असा त्यांच्या दरम्यान संवाद झाला. मात्र, पोलिसात तक्रार देणाऱा पती माहिती घेण्यासाठी गेला नसल्याने आरोपींचा डाव फसला.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पवनला पकडून विचारपुस केली असता वेगळेच सत्य समोर आले.
विचारपूस करताना पवन तक्रारदाराच्या पत्नीशी नव्हे तर मुलीशी अफेअर असल्याची कबुली दिली व 90 हजार रुपयाची मुलीच्या वडीलांना मारण्याची सुपारी दिली असल्याचे सांगितले. याआधी तक्रारकर्त्या पतीने आपल्या पत्नीचे आरोपीसोबत संगनमत करून 90 हजार रुपये देऊन मला जीवे मारण्याचा कट रचला असल्याची माहिती पतीने पोलिसात दिली होती मात्र चौकशीत मुलीनेच कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पती शरद बाबूलाल चव्हाण यांनी तक्रार दिली की, आरोपी पत्नी सुनंदा शरद चव्हाण व पवन इंदल पवार रा. लोहारा यांनी फिर्यादीला मारण्यासाठी 90 हजार रुपये दिले.
तसेच पूर्ण माहिती द्यायची असेल तर 10 हजार रुपये दे व मला भेटण्यासाठी कारंजा येथे ये. यासोबतच तुला सुनंदा व पव च्या अफेअर बाबत माहिती देतो, असे म्हटले.
अशा तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्र 1176/2020 कलम 115,34 नुसार गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी पवन पवार यास अटक केली.यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ मोरे यांनी या प्रकरणात तपास केला.
पत्नीसह आरोपीनी मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.
प्रियकराने प्रेयसीसाठी कट रचला
या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय आदिनाथ मोरे यांनी केला असता त्यात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी पवन पवार याने हा कट रचला असून फिर्यादीचे मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते.
मुलीचा बाप यामध्ये अडसर ठरू शकतो म्हणून आरोपीने लोहारा येथील त्याचा मित्र देविदास राठोड याला सोबत घेऊन फिर्यादीचे मुलीकडून तिचे वडिलांना मारण्यासाठी पैसे घेऊन कट रचला.
परंतु फिर्यादी हा त्यांना भेटला नसल्याने त्यांचा प्रयत्न फसला.ह्या बाबी तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात तिसरा आरोपी देविदास सुधाकर राठोड रा लोहारा यालाही ता 8 चे रात्री अटक केल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय आदिनाथ मोरे यांनी दिली.
संपादन - विवेक मेतकर, अकोला
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.