निम्मा खर्च, उत्पन्न तिप्पट!, उत्तमराव आणि लताबाई यांनी पिकविले एकरी दहा क्विंटल सोयाबीन

Akola News: Half cost, triple income !, Uttamrao and Latabai grow ten quintals of soybean per acre from organic farming
Akola News: Half cost, triple income !, Uttamrao and Latabai grow ten quintals of soybean per acre from organic farming
Updated on

अकोला :  जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील उजळेश्‍वरच्या उत्तमराव व त्यांच्या पत्नी लताबाई नानोटे या दाम्पत्यांनी कष्ट, जीद्द व विषमुक्त शेतीच्या ध्यासातून एकरी दहा क्विंटल सेंद्रिय सोयाबीन उत्पादन घेतले आहे. त्यांना पावनेचार एकरात ३८ क्विंटल सोयाबीन उत्पादन झाले आहे.

सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करताना त्यांना रासायनिक शेतीच्या तुलनेत जवळपास निम्मा खर्च कमी लागला असून, उत्पन्न तिप्पट झाल्याचे ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी सांगितले.


सेंद्रिय शेतीची कास धरत अनेक शेतकरी प्रयत्नशिल असून, त्यांना यशही मिळत आहे. अशाच प्रकारची यशोगाथा जिल्ह्यात बार्शीटाकळी तालुक्यातील उजळेश्‍वर येथील नानोटे दाम्पत्याची आहे.

गेली अनेक वर्षे ते २० एक्कर शेतीवर पारंपरिक पीक घेत आहेत. रासायनिक पद्धतीने शेती करताना त्यांना एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन व्हायचे व अपेक्षित गुणवत्ताही मिळत नव्हती. मात्र गेल्या तीन वर्षात त्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरली व अपेक्षेच्या दुप्पट उत्पादन आणि तिप्पट उत्पन्न त्यांना यावर्षी रब्बी आणि खरिपातून मिळाले आहे. पावनेचार एकरात रब्बीमध्ये ५० क्विंटल सेंद्रिय गहू आणि खरिपात ३८ क्विंटल सेंद्रिय सोयाबीन उत्पादन घेतल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.


पंचागानुसार पेरणी केली, पेरणीपूर्वी छत्तीचा गोळा १३ लिटर पाण्यात फिरवून एकरी एक गोळा शेतात फेकला. २० दिवसानंतर दिवेची फवारणी व पुढे सरल खताच्या तीन फवारण्या केल्या. त्यामध्ये ऊर्जाचे २०० ग्रॅमचे पाकीट, दहा किलो गोमित्र, पाच किलो शेण, पाच किलो कडूनिंबाचा पाला, दोन किलो सिताफळाचा पाला, दोन किलो टणटणीचा पाला, रुईचे झाड तीन किलो, एस ९ कल्चरचे एक पाकिट, याचे मिश्रण सात दिवस फिरवून त्यांच्या फवारण्या केल्या. त्यानंतर सर्व अळ्या नष्ट झाल्या, शेंग जाडी झाली, दाण्यात चमक आली व जवळपास निम्म्या खर्चात उत्पादन दुपटीने आणि उत्पन्न तिप्पट झाले.
- उत्तमराव नानोटे, सेंद्रिय शेती उत्पादक, उजळेश्‍वर

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.