अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू आपल्या आक्रमक शैलीसाठी प्रसिध्द आहेत. अनेक आंदोलने आणि अनेक प्रश्न त्यांनी आपल्या याच आक्रमक शैलीने सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र वेगळंच घडलं, अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना नेहमी कोंडीत पकडणाऱ्या बच्चू कडूंना शेतकऱ्यांनीच घेरलं. त्याचं कारणंही तसंच होतं. हेही वाचा -नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तेल्हारा तालुक्यातून मका खरेदी केल्यानंतर सुद्धा गत ८-९ महिन्यांपासून शेतकऱ्यांना मका खरेदीची रक्कम मिळत नव्हती. यावर आक्रमक शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनासमोर पालकमंत्री बच्चू कडू यांच्या गाडीसमोर ठिय्या दिला. हेही वाचा -आता सरपंच होणार कोण, कसे असेल ग्रामपंचायतचे आरक्षण? जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत पोलिस कारवाई झाली तरी जागेवरुन न उठण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. हेही वाचा - शेगाव,शिर्डी देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात, दोघांचा मृत्यू, नऊ गंभीर खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने करण्याचा सूचना शासनाकडून मिळल्यानंतर सुद्धा तेल्हारा तालुक्यात तांत्रिक कारणामुळे मका खरेदी ऑफलाईन पद्धतीने करण्यात आली. परंतु त्यानंतर शासनाच्या संकेतस्थळावर खरेदीची माहिती अपलोड करण्यात आली नाही. हेही वाचा -अनाथ अनुराधाचे सुख नियतिलाही पहावले नाही! परिणामी गत आठ-नऊ महिन्यांपासून तेल्हारा तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांना मका खरेदीची रक्कम मिळाली नाही. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिंजवल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याने त्यांनी सोमवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालय गाठत पालकमंत्री बच्चू कडू यांच्या शासकीय वाहनासमोर ठिय्या दिला. जोपर्यंत पैसे मिळत नाही, तोपर्यंत योग्य जागेवरून न हलण्याचा आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. हेही वाचा -बापरे, डॉक्टर तुम्ही सुध्दा!, हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली सुरू केला वेश्याव्यवसाय त्यामुळे याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनचे थानेदार उत्तम जाधव यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांची पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा घडवून आणून दिली. शेवटी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत पालकमंत्री बच्चू कडू यांनी चर्चा करत शेतकऱ्यांची समस्या तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. हेही वाचा - सीरम इन्स्टिट्यूट मधील आगीत अकोल्याच्या युवकाचा मृत्यू (संपादन - विवेक मेतकर) | |||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.