Akola News : लाखो अनुयायी होणार धम्म मेळाव्याचे साक्षीदार! धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा; पी.जे. वानखडे यांची माहिती

सन् १९८४ पासून अर्थात गत ३९ वर्षांपासून महानगरात प्रत्येक वर्षी दसरा अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी वंचितचे
dhamchkr
dhamchkr sakal
Updated on

अकोला - भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बुधवारी (ता. २५) आयोजित धम्ममेळावा यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्या येणार आहे. मेळाव्याची गावागावात जय्यत तयारी सुरू आहे. राज्य व जिल्ह्यातील लाखो बौद्ध अनुयायी या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मेळाव्याचे आयोजक भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पी.जे. वानखडे यांनी अशोक वाटीका येथे रविवारी (ता. २२) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सन् १९८४ पासून अर्थात गत ३९ वर्षांपासून महानगरात प्रत्येक वर्षी दसरा अर्थात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दुसऱ्या दिवशी वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म मेळावा साजरा करण्याची परंपरा अखंडपणे सुरु आहे. यंदाही बुधवारी (ता. २५) अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर धम्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

मेळाव्यात विशाल जनसमूदाला मार्गदर्शन करण्यापूर्वी ॲड. आंबेडकर धम्मरथावर आरूढ होऊन मिरवणुकीचे नेतृत्व करत असतात. विशाल मिरवणूक, ओसंडून वाहणारा उत्साह, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, झाक्या, घोडे, स्वंयशिस्त समूह, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, समता सैनिक दलाचे पथसंचालन, मिरवणुकीचे व्यापारी वर्गांसह सर्वधर्मियांकडून होणारे स्वागत आणि राजकीय, सामाजिक दिशा देणारी ॲड.

dhamchkr
Akola News : काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी; बंदुकीने उडविण्याची धमकी दिल्याचा आरोप

बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य राहणार आहे, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष पी.जे. वानखडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा महासचिव, मिलींद इंगळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, श्रीकांत घोगरे, राजकुमार दामोदर, धीरज इंगळे, महिला अध्यक्ष वंदनाताई वासनिक, गजानन गवई प्रचार प्रसार समिती प्रमुख विकास सदांशिव, पराग गवई व इतरांची उपस्थिती होती.

dhamchkr
Akola Crime : तीन हजारांची लाच घेणारा हवालदाराला अटकेत

या मार्गाने काढणार मिरवणूक

धम्म मेळाव्यापूर्वी रेल्वे स्टेशनवरुन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शिवाजी कॉलेज, अकोट स्टॅन्ड, मानेक टॉकीज, मंगलदास मार्केट, सिटी कोतवाली, गांधी चौक, बस स्टॅन्ड टावर मार्गे मिरवणूक अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पोहोचेल. या ठिकाणावरुन सायंकाळी ६ वाजता धम्म मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.