भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे कोरोना पॉझिटिव्ह, उपचार खासगीत

Akola News: MLA Prakash Bharasakle corona positive, treatment at a private hospital
Akola News: MLA Prakash Bharasakle corona positive, treatment at a private hospital
Updated on

अकोला : अकोला जिल्हय़ात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव हाताबाहेर जात असल्याचे चित्र आहे. सलग ५२ दिवसांपासून निरंतर रुग्ण संख्या, तर १२ दिवसांपासून दररोज करोनाचे बळी जात आहेत. त्यामुळे जिल्हय़ात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. उपाययोजनातील त्रुटी आणि उणिवा रुग्णवाढीसाठी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. 

अकोट विधानसभा मदतारसंघाचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि त्यांचा स्वियसहायक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर गत चार दिवसांपासून अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भाजपच्या गोटातून मिळाली आहे.

गत मार्चपासून आमदार प्रकाश भारसाकळे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील त्यांच्या निवास स्थानी होते.

मधल्या काळात त्यांनी अकोला येथे काही कार्यक्रमात व जिल्हाधिकारी कार्यालयातील सभांनाही हजेरी लावली होती.

चार-पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची कोविड-१९ तपासणी करण्यात आली. त्यात ते पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपाचार करण्यात येत असल्याची माहिती आहे. याच रुग्णालयात त्यांच्या स्वियसहायकावरही उपाचर केले जात आहे.

अकोला जिल्हय़ात गत दोन महिन्यांपासून करोना संसर्ग सातत्यपूर्ण वाढला. शहरातील बहुतांश परिसर व्यापून घेतल्यानंतर ग्रामीण भागातही करोना वेगाने पसरतो आहे. अकोल्यात ७ एप्रिलला करोनाने शिरकाव केला, तर १३ एप्रिल रोजी शहरात पहिला बळी गेला.

अगोदर परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात असताना मे व जूनमध्ये रुग्ण व मृत्यू संख्या झपाटय़ाने वाढली. २८ एप्रिलपासून सुरू झालेली रुग्ण वाढीची मालिका अद्यापही अखंडित आहे. त्यातच दुर्दैव म्हणजे रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढत गेले. गेल्या १२ दिवसांपासून सलग मृत्यू होत आहेत. १८ जूनच्या सकाळच्या अहवालापर्यंत अकोला जिल्हय़ात एकूण १०९६ सकारात्मक रुग्ण, तर ५८ जणांचे मृत्यू झाले. करोनामुळे विदर्भात सर्वाधिक मृत्यू अकोला जिल्हय़ात झाले. मृत्यू रोखण्यात उपचारपद्धती निष्फळ ठरत आहे.

सवरेपचार रुग्णालयातील गैरव्यवस्थेवरून प्रचंड ओरड आहे. दमा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, किडणीची समस्या असे काही दुर्धर आजार पूर्वीपासून असल्यास मृत्यूचा धोका वाढतो. मृत्यू होणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध व इतर आजारांची पार्श्वभूमी असलेले रुग्ण जास्त आहेत.

रुग्णाची परिस्थिती अत्यवस्थ झाल्यानंतर उशिराने सवरेपचार रुग्णालयात पाठवल्यावर मृत्यू झाल्याची संख्याही मोठी आहे. यावर नियंत्रणासाठी सर्वेक्षणात समोर आलेल्या शहरातील ७०० ते ८०० वयोवृद्ध व इतर आजार असलेल्यांवर देखरेख ठेवली जात आहे. नमुने घेण्याचे केंद्र वाढवण्यात आले. इतरही प्रयत्न सुरू आहेत. अद्याप तरी मृत्यू रोखण्यात यश आलेले नाही.

(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()