अकोला - चोरीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू व दागिने यावरून होणारा सराफा व्यावसायिक व पोलिसांमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी स्वर्ण दक्षता कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला येथील सराफा व्यावसायिकांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेवून व्यावसायिकांना येणाऱ्या समस्यांचा पाढाच त्यांच्यापुढे वाचला.
महाराष्ट्रातील सोन्या -चांदीचे व्यापार करणाऱ्यांना होणाऱ्या त्रासाबाबत अनेक जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध तकारी दाखल झाल्या आहेत. काही तक्रारी थेट उच्च न्यायालयात दाखल झाल्यात. त्या संदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे न्यायालयासमोर स्पष्टीकरण देताना अडचणी येतात.
न्यायालयात यापुढे पोलिस विभागामार्फत अशा चुका होणार नाहीत, अशी लेखी हमी द्यावी लागली आहे. त्याबाबत पोलिस महासंचालकांना ता. १८ ऑगस्ट २००९ अन्वये तपासी अधिकारी या करीता मार्गदर्शक तत्वे निर्गमित केली आहेत. तरीसुद्धा सराफा व पोलिसांमध्ये संघर्ष होताना दिसून येत असून, त्यातून व्यापारी आणि पोलिसांमध्ये दुराग्रह निर्माण होत आहे.
हा दुराग्रह दूर होवून खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी व पोलिसांना तपासात सहकार्य होण्याकरिता अकोला जिल्ह्यात स्वर्ण दक्षता समिती स्थापन करण्याचा आग्रह सराफा व्यावसायिकांनी पोलिस अधीक्षकांकडे धरला.
त्यावर पोलिसांचे कामकाजात कोणतेही अडथळा येवू नये तसेच प्रामाणिक सोन्या-चांदीचे व्यापारी यांना त्रास होवू नये याकरिता पोलिस आणि सराफा व्यापारी यांचे समन्वये साधण्याकरिता समिती स्थापन करण्यावर एकमत झाले.
बुधवारी झालेल्या या बैठकीला सराफा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शैलेष खरोटे, नितीन खंडेलवाल, सुनील जांगिड, राहुल भगत, मनिष हिवराळे, अशोक भंडारी, परेश सराफ, भावेश पाचकवडे, किशोर देशमुख, चेतन कोरडिया, राजेश अदानकर आदींसह इतर सराफा व्यावसायिक उपस्थित होते.
या दिल्यात सूचना
सराफा व्यावसायिकांकडे दागिने गहाण ठेवण्याकरिता येणाऱ्यांची माहिती नोंदवून घ्यावी.
ओळखीसाठी त्याचा फोटो तसेच संपूर्ण पत्ता नोंदवून घ्यावा.
पुरावा म्हणून शासनाने ठरवून दिलेल्या पुराव्यांपैकी एकाची प्रत घ्यावी.
दागिने किंवा वस्तूची जुनी पावती शक्य असल्यास रेकॉर्डवर ठेवावी.
शक्य नसल्यास कागद पत्राची शहानिशा करून व्यवहार करावा.
नमुना फॉर्म विक्री किंवा गहाण ठेवण्यासाठी येणाऱ्याच्या हस्ताक्षरात भरून घ्यावा.
त्याने माल अगोदर घेतल्याची पावतीची शहानिशा करावी.
पावतीमध्ये दागिन्याचे वजन व शुद्धता नमूद करून तीची रक्कम दिली हे त्याचे हस्ताक्षरात घ्यावे.
माल खरेदी करण्यासाठी सराफा व्यावसायिकांनी पावती पुस्तक ठेवले नाही तर आरोपीचे सांगण्याप्रमाणे कार्यवाही करण्यास पोलिसाना दुजोरा मिळू शकेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.