घाटबोरी (जि.बुलडाणा) : रुग्णालयात कोविडचे उपचार घेत असलेला माझा भाऊ जीवंत अथवा मृत दाखवा अन्यथा आत्मदहन करेल असा इशारा देवराव वाघमारे यांच्या भावाने दिल्याने खळबळ उडाली आहे.मेहकर तालुक्यातील विश्वी येथील देवराव वाघमारे कोविड रुग्णालयातून पळून गेल्याचे वृत्त झळकल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी हा इशारा दिला आहे.
मेहकर तालुक्यामधील विश्वी येथील देवराव हरी वाघमारे हे प्लेटलेस कमी झाल्यामुळे मेहकर येथे खाजगी डॉक्टरने जादा रक्कम सांगतल्याने, घरची परस्थीती अतिशय गरिबीची असल्यामुळे त्यांना अकोला येथे शासकीय वैधकीय महाविद्यालय येथे नेण्यात आले.
त्यानंतर संबंधित डॉक्टर, नर्स यांनी रुग्णाची कोविड टेस्ट करणे आवश्यक असल्याचे सांगतल्याने येथे रुग्णाजवळ कोणीही थांबू नये, म्हणुन दोन दिवस रुग्णालयाच्या गेटपासी रुग्ण देवराव वाघमारे यांचे दोन्ही मुले रात्रंदिवस मुक्काम केला. दोन्ही मुलांनी सिस्टरला विनंती केली की,आम्हाला आमच्या वडिलांचा दुरुन तरी चेहरा दाखवा, पण मुलांची भेट नाकारली, अखेर तिसऱ्या दिवशी रुग्णाचे दोन्ही मुले जबरदस्ती रुग्णालयात वडिलांची तब्येत पाहण्यासाठी गेले असता, वडील त्या वार्डात दिसून येत नसल्याने, नर्स, डॉक्टर, यांच्याकडे मुलांनी विचारपूस केली. आमचे वडील कुठे आहेत? पण प्रत्येकजण उडवा-उडवीचे उत्तर देत असल्याने, रुग्णाचा भाऊ, मुले यांनी अनेक नातेवाईक यांना फोनद्वारे माहिती दिली.
रुग्ण देवराव वाघमारे कुठेही आढळून न आल्याने अखेर हे सर्व नातेवाईक रुगणालयांच्या डी.एम.ला भेटले तेव्हा डी. एम.ने सीसीटीवी फुटेज दाखवतो असे आश्वासन दिले, पंरतु नंतर सी.सी.टीवी.बंद असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉक्टरच्या उडवा-उडवीच्या उत्तरामुळे अखेर नातेवाईकांनी कोतवाली पोलिस स्टेशन अकोला येथे रिपोर्ट दिला. तरीसद्धा चौकशी झाली नाही, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय अकोला व जिल्हाधीकारी अकोला यांच्याकडे रुग्ण देवराव हरी वाघमारे (वय ५५) यांचा भाऊ गजानन हरी वाघमारे यांनी लेखी निवेदनाद्वारे सदर प्रकरणांची चौकशी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करुन निवेदनात सर्व हकीकत नमुद करुन येत्या १० सप्टेंबरपर्यंत माझा भाऊ जीवंत द्या किंवा मृत दाखवा, अन्यथा ११ सप्टेंबर रोजी मी आत्मदहन करेल असा इशारा देण्यात आला. त्यामुळे सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराची सखोल चौकशी करावी अशी अनेकांची अपेक्षा आहे.
मेहकर तालुक्यामधील विश्वी येथील देवराव हरी वाघमारे हे शासकीय वैधकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असता, अचानक गायब झाल्याची वार्ता चोहकडे वाऱ्यासारखी पसरली. हा सर्व प्रकार गंभीर असून,रुग्णालयाच्या सुरेक्षवर, गेल्या दहा-बारा दिवसापासून प्रशासनाने शोध घेतला का! असे अनेक प्रश्न उपस्थित होतात, पण रुग्णाचा भाऊ गजानन वाघमारे यांना न्याय मिळून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक पवित्रा घेऊन आंदोलन करण्यासाठी तयार आहे.
-महेंद्र डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, अकोला.
(संपादन - विवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.