Akola News : मनपा क्षेत्रात डेंग्यूचा ‘डंख’ ; रुग्णालयात वाढली उपचार घेणाऱ्यांची संख्या

फवारणीसाठी वाढविले कामगारमहापालिका क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर डेंग्यू व डेंग्यू सदृष्य रुग्णांची संख्या वाढत आहे.
akola
akola news
Updated on

मनोज भिवगडे

अकोला - ऑक्टोबर हिटमुळे वाढलेले तापमान व बदलत्या हवामामुळे जिल्ह्यामध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महापालिका क्षेत्रातही डेंग्यू व चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मनपाकडे गेले दोन महिन्यात ४५ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली असून, प्रत्यक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ५०० च्या वर असण्याची शक्यता आहे.

शहरातील अकोट फैल, शिवसेना वसाहत, डाबकी रोडसह इतरही भागात डेंग्यू व डेंग्यू सदृष्य आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येत आढळत आहेत. डेंग्यू सदृश आजाराने शहरामध्ये थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही रुग्ण वाढले आहेत.

डेंग्यूसदृश्य रुग्णांमध्ये प्लेटलेट कमी होत आहेत. यामुळे ब्लडबँकमध्येही प्लेटलेट्सची मागणी वाढली आहे. डेंग्यू या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासाच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्याप्रमाणात वाढत आहे.

akola
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

फवारणीसाठी वाढविले कामगारमहापालिका क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर डेंग्यू व डेंग्यू सदृष्य रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाकडून डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांची पाहणी करून फवारणीवर भर दिला जात आहे. त्यासाठी मनपा मलेरिया विभागाकडे असलेल्या १६ फवारणी कामगारांसोबतच इतर विभागातील २० कामगार फवारणीच्‍या कामासाठी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन गायकवाड यांनी दिली. खदान व मोठे जलाशय अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ नये म्हणून गप्पी मासे सोडण्यात आली असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

akola
Sangli News : १९ गावांच्या पाणी प्रश्नासाठी सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचे उपोषण 'ह्या' आहेत मागण्या

डेंग्यू संदृष्य असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जात आहे. याशिवाय संसर्गजन्य व किडकजन्य आजार होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असून, नियमित फवारणीही मनपातर्फे केली जात आहे.

डॉ. अनुप चौधरी, वैद्यकीय अधिकारी, मनपा

अकोला शहरामध्ये डेंग्यूची साथ दिसून येत आहे. डेंग्यूसह डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. वातावरण पोषक असल्याने साथ रोगाचा संसर्ग झपाट्याने होतो आहे. सावधानता बाळगून उपचार घ्यावयाचे आहेत. मनपातर्फे सर्वच परिसरात नियमित फवारणी केली जात आहे. त्यासाठी फवारणी कामगारांची संख्याही वाढविण्यात आली आहे. मनपा क्षेत्रात औषधांचा आवश्यक साठा आहे.

डॉ. नितीन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, मनपा

akola
Akola News : रेबीजचा धोका टाळण्यासाठी श्वानांचे लसीकरण करा - डॉ. बुकतारे

डेंग्यूची लक्षणे

रुग्णाला अचानक थंडी वाजून ताप येतो.

डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना

मळमळ, अंगावर सूज आणि चट्टे येणे

डासाने चावा घेतल्यानंतर ४ ते १० दिवसांत लक्षणं दिसू लागतात

येथे होते डासांची उत्पत्ती

कुलरमधील शुद्ध पाणी

शुद्ध पाणी साठवून ठेवलेली उघडी भांडी

शोभवंती झाडांच्या कुंड्या

उघड्यावर साठून असलेले शुद्ध पाणी

संसर्गासाठी पोषक वातावरण

अकोला शहर व जिल्ह्यात तापमानात मोठ्याप्रमाणात चढउतार बघावयास मिळत आहे. त्यामुळे साथ रोगांचा संसर्ग वाढण्यास पोषक वातावरण आहे. तापमान कमीअधिक होत असल्याने अनेकांनी उद्याप कुलरचा वापर बंद केलेला नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन संसर्ग वाढण्याची शक्यताही अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.