मूर्तिजापूर नगर परिषद पाणी पुरवठ्याचे नियोजन शून्य कारभार

Akola News: Thousands of gallons of water wasted every day; Murtijapur Municipal Council Water Supply Planning Zero Management
Akola News: Thousands of gallons of water wasted every day; Murtijapur Municipal Council Water Supply Planning Zero Management
Updated on

मूर्तिजापूर (जि.अकोला) :  नगर परीषदेच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन शून्य कारभारामुळे शहरात आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिकेजेस असल्यामुळे दररोज हजारो गॅलन पाण्याचा अपव्यय होत आहे.

हा पाणी पुरवठा दर पाच ते सहा दिवसात होण्यासाठी नगर परीषदेला आदेशीत करण्याची मागणी एका तक्रारी द्वारे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी पालकमंत्री बच्चू कडू आणि जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे केली आहे.


सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे. यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. त्यामुळे जमिनीत व धरणात मुबलक पाणी साठा आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात ८ ते ९ दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो.

पाणी टाकी भरल्यानंतर ही शहरात पाणी पुरवठा केल्या जात नाही. रात्रभर पाणी पुरवठा बंद असतो.शहरातील गोयनका नगर येथील पाण्याच्या टाकीवरील ३ते ४ इंच मेन पाईपलाईन लाईनवर मोठ्या प्रमाणात लिकेजेस असल्यामुळे पाणी पुरवठा सुरु केल्यानंतर लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.

पाणी पुरवठा विभागाचे इंजिनिअर आठवडयातुन एक दिवस येवून पाहणी करतात. पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी कुणाला न सांगता काम करतात. एक ते दोन दिवसात होणारा पाणी पुरवठा १५ ते २० दिवस होत नाही. यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित करणे संबंधीत कर्मचाऱ्यांना अडचणीचे ठरत आहे.

पाणी पुरवठा ८ ते ९ दिवसांनी होत असल्यामुळे पाणी साठवून ठेवल्याने मच्छरांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. शहरात काही ठिकाणी लहान मोठे झोन आहेत तर काही ठिकाणी झोनच नाही. प्रभाग क्र.६ मध्ये जुनी वस्ती टांगा चौक,रोशनपुरा,मलाईपुरा या भागातील झोन वेगळे करण्यात यावे.जेणेकरुन जुनी वस्ती भागातील नागरिकांना वेळेवर मुबलक पाणी मिळेल.

तसेच मातंगपुरा प्रभाग क्र ६ मधील मंजूर असलेली पाईपलाईन टाकण्यात यावी.असेही नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रति.जिल्हाधिकारी अकोला, आमदार गोपीकिशन बाजोरिया, उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर, मुख्याधिकारी न.प.मूर्तिजापूर, विभागीय आयुक्त नगर प्रशासन अमरावती यांनीही दिल्या आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.