लस संपली; लसीकरण थांबले!, लाभार्थ्यांना पाठवले परत

akola news Vaccines run out; Vaccination stopped !, patients sent back
akola news Vaccines run out; Vaccination stopped !, patients sent back
Updated on

अकोला  ः कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील १५० केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत असतानाच लस संपल्यामुळे कोरोना विरूद्धच्या लढाईचा वेग मंदावला आहे. मोजक्याच लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असल्याने शनिवारी (ता. १०) त्याठिकाणी लसीकरण करण्यात आले, परंतु काही केंद्रांवर लस संपल्याचे जाहीर करत लाभार्थ्यांना लशींचा पुरवठा झाल्यानंतर लस घेण्यासाठी यावे, अशी विनंती आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केली.

१६ जानेवारी २०२१ रोजी देशात कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धा व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दुर्धर आजारग्रस्तांचे लसीकरण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच केंद्रांमध्ये ज्येष्ठांचे लसीकरण करण्यात येत होते. त्यासोबतच १ एप्रिलपासून ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांचे सुद्धा लसीकरण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात ६ लाखांच्या जवळपास असून सदर वयोगटातील लाभार्थी मोठ्‍या संख्येने लस घेत आहे. दरम्यान असे असले तरी जिल्ह्याला कोरोना लशींचा अल्प साठा मिळाल्यामुळे लसीकरण मोहिमेचा वेग मंदावला आहे. शनिवारी (ता. १०) दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश केंद्राची लस संपल्यामुळे लसीकरण मोहीम सुद्धा ठप्प पडली.
--------------
कोठे काय आढळले
- शनिवारी १० एप्रिल रोजी जुने शहरातील डाबकी रोड वरील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील लस दुपारनंतर संपली. त्यामुळे या ठिकाणी लसीकरणासाठी पोहोचणाऱ्या लाभार्थ्यांना परत पाठवण्यात आले. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना लस देण्यात येईल, अशी माहिती या वेळी रुग्णालयात उपस्थित डॉक्टर फारुक शेख यांनी दिली.
- शहरातील खडकी येथील लसीकरण केंद्रावर लसीचा साठा उपलब्ध नसल्याने शनिवारी १० एप्रिलरोजी सकाळपासूनच लाभार्थ्यांना घरी परत पाठवण्यात आले. दुपारनंतर साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण करण्यात येईल, असे यावेळी लाभार्थ्यांना उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.
- १० एप्रिल रोजी नसल्यामुळे शहरातील काही लसीकरण केंद्रामधून करण्यात येणारे लसीकरण बंद करण्यात आले, परंतु दुपारी दोन वाजता नंतर सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांची गर्दी दिसून आली. यावेळी रुग्णालयातील केंद्रात लाभार्थ्यांना पहिला व दुसरा डोस देण्यात आला.
(संपादन - विवेक मेतकर)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.