अकोला ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. परंतु हा ऑनलाईन अभ्यासक्रम मुलांच्या डोळ्यांसाठी हानिकारक ठरत आहे. ‘व्हिजन सिंड्रोम’ या डोळ्याच्या आजाराने अनेक विद्यार्थ्यांना ग्रासले आहे. अधिक स्क्रिन टाईम हा मुलांसोबतच मोठ्यांसाठीही तेवढाच हानिकारक असल्याचा इशारा अकोल्यातील नेत्र तज्ज्ञ डॉ. श्रीराम लाहोळे यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दिला आहे.
आरोग्याबाबत जनजागृतीच्या उद्देशाने दवर्षी ता.७ एप्रिल रोजी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. आज अनेक व्याधींसोबत डोळ्यांचे आजारही मोठ्याप्रमाणावर बळावले आहेत. त्यात कोरोना संकट काळाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अभ्यासक्रमाने आणखीच भर टाकली आहे. प्रदूषण, खानपानाच्या वाईट सवयी, टीव्ही, संगणक, मोबाईलवर अधिक काळ घालवणे यामुळे डोळ्याचे आजार वाढले आहेत. जिल्ह्यासह संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून, ही लाट पहिल्याला लाटेएपेक्षाही भयंकर चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे सध्या तरी शाळा सुरू होण्याची शक्यता पूर्णपणे मावळली आहे. त्यामुळे अनेक शाळा आणि कोचिंग क्लासेस आपल्या विद्यार्थ्यांसाठी गेल्यावर्षी प्रमाणेच ऑनलाइन अभ्यासक्रम पुढे सुरू ठेवण्याच्या विचारात आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकांना आपल्या मुलांच्या डोळ्या संदर्भात काळजी घेणे कमप्राप्त आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
.............................
डोळ्यांवरील तान वाढतोय
मुलांच्या नाजूक डोळ्यावरील तान सतत स्क्रीनपुढे राहिल्याने वाढत जातो. त्यातून मुलांना ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’ हा आजार होऊ शकतो. केवळ शाळकरी मुलंच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ‘वर्क फॉर्म होम’ अंतर्गत ऑनलाइन काम करणारे अधिकारी, कर्चमारी यांनाही हा आजार होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
..............................
ही आहेत लक्षणे!
ऑनलाइन अभ्यासक्रमाने स्क्रीन टाईम वाढल्यामुळे अनेक लहान मुलांना डोळ्याच्या समस्या जाणवत असल्याच्या तक्रारी लॉकडाउनच्या काळात नेत्र तज्ञांकडे मोठ्या प्रमाणावर आल्यात. त्या पार्श्वभूमीवर डॉ. श्रीराम लाहोळे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना डोळ्याची काळजी घेण्याबाबत सूचित केले आहे. त्यांनी डोळ्याच्या आजाराबाबत काही लक्षणेही सांगितली आहेत. त्यात डोळे दुखणे, डोळे कोरडे होणे, डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे, अंधुक दिसणे ही ‘व्हिजन सिंड्रोम’ या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित नेत्र तज्ञांकडे जाऊन उपचार करून घ्यावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले.
...............
स्क्रिनवर कोणत्या वयातील मुलांनी किती वेळ द्यावा?
- पाच वर्षांखालील ः जागतिक आरोग्य संघटनेनुसार पाच वर्षाखालील मुलांनी डिजिटल उपकरणांवर दररोज एक तास किंवा त्याहीपेक्षा कमी कालावधी घालवावा.
- पाच वर्षांवरील ः पाच वर्षांवरील मुलांनीही याचा सातत्याने वापर टाळावा. अनावश्यक वेळी टाईमपास म्हणून मोबाईल, संगणक, लॅपटॉप बघत बसू नये.
...................................
डोळ्यांचा आजार टाळण्यासाठी उपाययोजना
अभ्यास करताना संगणक किंवा मोबाइलच्या स्क्रीनवरून मुलांनी पंधरा ते वीस मिनिटांनी तीस सेकंदासाठी आपली दृष्टी दुसरीकडे हटवावी. संगणकावर अँटिक ग्लास स्क्रीन कव्हर लावावे. मजकूर मोठा दिसण्यासाठी ठळक फॉन्टचा वापर करावा. डोळ्यांना सुखद वाटणारी रंगसंगती ठेवावी, असा सल्ला आरोग्य दिनानिमित्त डॉ. श्रीराम लाहोळे यांनी दिला आहे.
(संपादन - विेवेक मेतकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.