नदीच्या पूरातील थरारक प्रसंग: चिमुकल्याला वाचवण्यासाठी बापाची यशस्वी झुंज

Akola News: The whole tremor of the river: Fathers successful struggle to save boy
Akola News: The whole tremor of the river: Fathers successful struggle to save boy
Updated on

अकोला: घटना आहे दोन दिवसांपूर्वीची.. कारंजा लाड येथील नासिरखान हे आपल्या पत्नीसह तीन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन कारंजा वरुन अकोलाकडे निघाले.... वाटेत काटेपूर्णा धरणाचे पाणी सोडल्याने नदी दुथडीभरून वाहत होती... पाणी पाहण्यासाठी नासीरखान पुलावर थांबले...  मुलगा दुचाकीवरुन खाली पडु नये यासाठी समोर छातीवर रुमालाने बांधून ठेवले...


याच परीस्थितीत अचानक तोल जाऊन ते मुलासह नदीत कोसळले आणी पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊ लागले. क्षणातच पत्नीने आरडाओरडा केला... तेव्हा नदीचा पूर पाहण्यासाठी दोनद येथील काही पुलावर आले. क्षणातच पुलापासुन 500 मी. अंतरावर वाहत जातांना नासीरखान हे पोटाला बांधलेल्या आपल्या मुलासह मोठया शिताफीने कसोशीने नदीच्या काठी झाडाला पकडत पकडत एका ठिकाणी मुलाला घेऊन सुखरुप थांबले. 

लगेच दोनद येथील 20-25 नागरिकांनी नदीच्या दोन्ही बाजुने शोधाशोध सुरू केली. एवढयातच अंदाजे 400-500 मीटरवर एका बाजूला दोनद येथील काही युवकांनी नासीरखान हे मुलासह अजनाच्या झाडाला धरुन बसल्याचे पाहून युवकांनी साखळी पद्धतीने एकमेकांच्या साहाय्याने घट्ट पकडून या बापलेकांना सुखरुप बाहेर आणले.


पुढे दोघा बापलेकांसह पत्नीला पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून दोघेही सुखरुप असल्याचे सांगितले आणि जीव भांड्यात पडला. नासीरखान गावला रवाना झाले. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी.   

दोनद येथील सागर कावरे यांच्या कार्यतत्परतेला सलाम​ अवघ्या काही मीनटातच घटनेची माहिती संत गाडगेबाबा पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली. क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी आपल्या सहकऱ्यांसह रेस्क्यु साहीत्य, रेस्क्यु बोट घेऊन दोनदकडे रवाना झाले.

तीन- चार किलोमिटर अंतर गाठताच एक फोन आला. की, दोघांनाही सुखरुप बाहेर काढले असे समजताच दीपक सदाफळे हे टीमसह परतले. यावेळी स्थानिकांनी मदतीसाठी धाऊन येणाऱ्या युवकांना पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले असल्याची माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.