Video : ह्रदयद्रावक, दारात बैल नाही, खाण्यापिण्याची अडचन, विधवा महिलेने बैलाऐवजी मुलालाच जुंपले शेती कामात

akola news Instead of oxen, a widow carries a shovel on her son's shoulders
akola news Instead of oxen, a widow carries a shovel on her son's shoulders
Updated on

घाटबोरी (जि. बुलडाणा) : मेहकर तालुक्यामधील घाटबोरी मध्ये अठराविश्व दारिद्र पाचविलाच पुंजलेल्या शेतकरी विधवा महिला शांताबाई शामराव सोनुने या महिलेने परस्थीतीवर मात करत,शेतात डवरणी करता चक्क आपल्या मुलाच्याच खांद्यावर'जू'जुतून शेतात डवरणी करत आहेत,


सध्या खरीप पेरणी आटोपल्या असुन डवरणीचा हंगाम चालू आहे. शेतीच्या कामाकरता सध्या शेतकरी नवनवीन गावठी जुगाड करुन शेतकरी कामे करत आहेत.परंतु घाटबोरी येथे विधवा महिला शांताबाई शामराव सोनुने,या महिलेचा पतीचे निधन, मुलगा तिन महिन्याचा असतानाच झाले.

संसाराचा गाडा चालवायचा कसा,अशा अनेक संकटाचा सामना करत आहेत. निराधार, अल्पभुधारक, तिन एकर कोरडवाहू जमिन,अन् त्यावरच संसाराचा गाडा चालवायचा, कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करायचा, अनेक संकटावर मात करत-करत आज रोजी तिन वेळा तिबार पेरणी केली, 

या तिबार पेरणी मुळे हताश: झालेल्या महिलेजवळ बैलजोडीवर डवरणी करण्यासाठी पैसा नाही, कोणी या कोरोना विषाणूच्या महामारी संकटात हात उसनवारी करत नाहीत,अशा अनेक विचाराच्या वैफल्यजनेतुन हताश न होता,या विधवा महिला शांताबाई शामराव सोनुने हिने चक्क आपल्या मुलाच्याच खांद्यावर'जू'जुतून शेतात डवरणी करत आहेत,त्यामुळे आतातरी शासन-प्रशासन यांना जाग येऊन या महिलेला आर्थीक मदत देण्यात येईल का! असा प्रश्न उपस्थित होतो.

दारात बैल नाही,खाण्यापिण्याची अडचन, भाड्याने डवरणीचा खर्च झेपावत नसल्याने,चक्क आपल्या एकुंत्या एक मुलाच्या खांद्यावर'जू'जुतून,स्वत:हातात रुमणे धरुन डवरणी करत आहेत.

(संपादन- विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.