अकोला पोलिसांचे एकाच वेळी चार ठिकाणी धाडसत्र : एक लाखाचा माल केला जप्त

पोलिसांनी १७ बॉटल विदेशी दारू किंमत २ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोला पोलिसांचे एकाच वेळी चार ठिकाणी धाडसत्र : एक लाखाचा माल केला जप्त
Updated on
Summary

पोलिसांनी १७ बॉटल विदेशी दारू किंमत २ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अकोला : जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर(akola sp g. shridhar) यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी ३१ डिसेंबरच्या रात्री चार कारवाया केल्या. यावेळी पोलिसांनी पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन एकूण १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी रात्री जुने शहरातील खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी आरोपी मोहम्मद शोएब शेख शफी (वय ३२) याच्या घरी छापा मारला. यावेळी आरोपीच्या घरातून पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व पान मसाला असा एकूण ५१ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.(Akola police raids at four places simultaneously One lakh goods seized)

या प्रकरणी डाबकी रोड पोलिस स्टेशन येथे आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई पोलिसांनी गुडधी येथील महाकाली हॉटेल येथे केली. पोलिसांनी हॉटेलमध्ये अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्या आरोपी स्वप्नील विनायक दुर्गे (वय ३२, रा. आखतवाडा) याला अटक केली. त्याच्या जवळून पोलिसांनी १४ बॉटल दारू किंमत २ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात बोरगाव मंजू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिसरी कारवाई घुसर येथील महाकाली हॉटेलमध्ये करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आरोपी विजय जगन्नाथ मदंकार (वय २९, रा. मोठी उमरी महाकाली नगर) याला विदेशी दारू विक्री करताना अटक केली. आरोपी जवळून पोलिसांनी १७ बॉटल विदेशी दारू किंमत २ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौथी कारवाई भिम नगर, शांतीनगर येथे अवैधरित्या वरली जुगारावर करण्यात आली.

अकोला पोलिसांचे एकाच वेळी चार ठिकाणी धाडसत्र : एक लाखाचा माल केला जप्त
पुण्यात चालणाऱ्यांचा ग्रूप पोचला २० हजार सदस्यांपर्यंत !

यावेळी पोलिसांनी आरोपी नितीन मुकुंद कुकड (वय ४५, रा. जाजू नगर डाबकी रोड) त्याच्याजवळून रोख ३ हजार ५५० रुपये व एक इलेक्ट्रिक मोटर सायकल किंमत ५० हजार रुपये व एक दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ६३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाई दरम्यान आरोपी रमेश उर्फ सिकंदर भिलंगे (वय ५०, रा. शांतीनगर, भिम नगर) फरार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.