भाजपचे आमदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेने केला ‘गेम’

Akola Political News BJP MLA ShivSena wan Dam Jayant Patil Farmer
Akola Political News BJP MLA ShivSena wan Dam Jayant Patil Farmer
Updated on

अकोला :  राज्यातील विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांच्या अनुपस्थितीचा सत्ताधारी शिवसेना आमदारांनी लाभ घेत वान प्रकल्पातून अकोला शहरासाठी आरक्षित पाणी रद्दचा डाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.

त्याला विरोध करणारे भाजपचे दोन्ही आमदार अनुपस्थित असल्याने जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनीही शिवसेना आमदारांच्या म्हणण्याला होकार देत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विषय ‘अकोला मनपा व जिगाव’कडे वळवून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा आदेश दिला.

बाळापूर व अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी ६९ प्रादेशिक पाणीपुरवठा याेजनेला वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत असल्याची बाब पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत उपस्थित केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी माहिती देताना वानमधून अकाेल्यातील अमृत याेजनेसाठी पाणी आरक्षित असून, प्रकल्पातून जळगाव जामाेद, शेगावलाही पाणी देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी शिल्लक राहणार नसल्याची भिती वाटत आहे. त्यामुळे शेतकरी विरोध करीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यावर बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी अकोला शहरासाठीचे २४ दलघम पाणी आरक्षणाला स्थगिती असून, या पाण्याचा वापर होत नाही. अकोला शहराला महान येथून पाणीपुरवठा होत असून, सध्या शहराला पाण्याची गरज नसल्याचे सांगितले. याशिवाय आमदारा देशमुख यांनी अकोला शहर खारपाणपट्ट्यात येत नसल्याने येथे जमिनीत गोड पाणी लागत असल्याची माहितीही जलसंपादा मंत्र्यांना दिली.

त्यावेळी अकोला शहराची बाजू मंत्र्यांकडे मांडण्यासाठी अकोला शहरातील दोन पैक एकही आमदार उपस्थित नव्हते. भाजपचे दोन्ही आमदार अनुपस्थित असल्याने सत्ताधारी आमदारांचे आयतेच फावले. त्यांनी मंत्र्यांकडून बाळापूर योजनेसाठी पाणी आरक्षण कायम ठेवण्यात येणार असल्याचा निर्णयाची मूक सहमतीच घेवून टाकली.

हेही वाचा - कृत्रिम ऑक्सीजन प्लांट ऑक्सीजनवर

शेतकऱ्यांचे लक्ष मनपा, जिगावकडे वळवा!
वान प्रकल्पाबाबतून पाणी आरक्षित करण्यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत बैठक घेवून त्यांची समजूत काढण्याची सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांना दिले. बैठक झाल्यानंतर त्यात झालेल्या निर्णयाचे कळविण्यासही सांगण्यास विसरले नाही.

शिवाय वानमधून मनपासाठी पाणी आरक्षित झाले असले तरी त्याची उचल होत नसल्याचा व संग्रामपूर, शेगावला जिगाव प्रकल्पातून पाणी दिले जाणार असल्याने तो भार कमी होणार आहे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वळविण्याची सूचनाही जलसंपदामंत्र्यांनी अभियंत्यांना केली.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.