नीमा अरोरा  महानगरपालिकेच्या पहिला महिला आयएएस आयुक्त

Akola Political News Neema Arora Municipal Corporations first woman IAS Commissioner
Akola Political News Neema Arora Municipal Corporations first woman IAS Commissioner
Updated on

अकोला : महानगरपालिका आयुक्तपदी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात अकोला महानगरपालिकाला महिला आयएएस अधिकारी मिळाल्या आहेत. मात्र, आयुक्त संजय कापडणीस यांची बदली कुठे करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

अकोला महानगरपालिकेचे आयुक्त संजय कापडणीस यांच्या बदलीबाबत गेले दोन महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा यांचाही समावेश आहे.

त्यांना अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली आहे. ते विद्यमान आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडून पदभार घेतील. सन २०१३ मध्ये आयएएस परीक्षेत ५० वे मानांकन मिळविणाऱ्या नीमा अरोरा यांना प्रथम परीविक्षाधिन अधिकारी म्हणून नंदुरबारमध्ये नियुक्ती मिळाली होती.

त्यानंतर त्यांची ३ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा परिषदेत जालना येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात जालना जिल्हा परिषदेने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविलेत. त्यानंतर आता त्यांना बुधवार, ता. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी अकोला महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती मिळाली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.