Akola News : दिवाळी आरक्षण फुल्ल झाल्याची बोंब सालाबादप्रमाणेच यंदाही

काही मिनिटात दिवाळी रेल्वे फुल्ल; दिवाळीला गावी जाण्यासाठी एकही तिकिट शिल्लक नाही
Railway
RailwaySakal
Updated on

अकोला - नोकरी धंद्यासाठी मुंबई, पुणे गेलेला अकोलावासी न चुकता दिवाळीला अकोला गाठतो. गावी जाण्यासाठी रेल्वे हा सगळ्यात परवडणारा आणि सोयीचा पर्याय असताना आरक्षण फुल्ल झाल्याची बोंब सालाबादप्रमाणेच यंदाही उठली आहे. रेल्वेच्या नियमाप्रमाणे ता. ११ नोव्हेंबर २०२३ चे दिवाळी आरक्षण १२० दिवस आधी सुरू झाले आणि अवघ्या काही मिनिटात आरक्षण फुल्लही झाले.

Railway
Akola News : लघुसिंचनचा बेताल कारभार;तीन अधिकारी निलंबित, अभियंत्यांना नाेटीस

तिकीट खिडकीवरून ‘वेटिंग’ तिकीट घेऊन परतावे लागले तर ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांना ‘रिग्रेट’ मेसेज पाहावा लागला. आपल्या हक्काच्या रेल्वेत एक कन्फर्म तिकीट मिळवायला झगडावे लागत आहे, अशी तीव्र भावना प्रवाशांन मधून व्यक्त होत आहे.

Railway
Akola Rain Update : महान धरणात गत वर्षीच्या तुलनेत १२ टक्के जलसाठा कमी

एजंटांशी साटेलोटे?

मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर मार्गावर इतक्या गाड्या धावत असताना दुसऱ्या मिनिटाला गाड्या फुल्ल होऊन रिग्रेट मेसेज कसा काय झळकू शकतो? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. एजंट आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी मिळून हा काळाबाजार करत आहेत का? त्याची चौकशी व्हायला हवी, असे एका प्रवाशाने सांगितले.

अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडा!

‘दिवाळीकरिता गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याचं समोर आलं आहे. दरवर्षी थोड्याफार फरकानं असाच प्रकार घडत असल्यानं अनेक प्रवाश्यांना गावी जाताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वेनी चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावं. तसेच विदर्भातील प्रवाश्यांच्या सोयीसाठी दिवाळीत अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्यात यावी. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून आरक्षणातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असे रेल्वे प्रवाशी संघटनेचे ॲड. अमोल इंगळे यांनी सांगितले.

Railway
Akola Nwes : निधी वाटपात भाजपच्या मतदारसंघाला झुकते माप, विरोधकांचा दावा

पुणे ते अकोला

हमसफर एक्स्प्रेस ६०

आझाद हिंद एक्स्प्रेस रिग्रेट

गरिबरथ एक्स्प्रेस रिग्रेट

महाराष्ट्र एक्स्प्रेस रिग्रेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.