अकोला : अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील मालधक्क्यावरून माल वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या माल वाहतुकीसंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश जारी केले आहेत. विशेष म्हणजे, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार गोवर्धन शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून मालधक्का सुरू करण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात आदेशात म्हटले आहे की, रेल्वे स्टेशन अकोला परिसरात सुरू असलेला मालधक्का माहे जुलै २०२० मध्ये बंद करून अकोला येथील दक्षिण-मध्य रेल्वे मार्गावरील शिवणी शिवापूर येथे रेल्वे रेक पॉईंट सुरू करण्यात आला होता. परंतू शिवणी शिवापूर येधील रेल्वे रेक पॉईंटमध्ये कवर शेड, फ्लोअरिंग कंम्पाऊंड, वॉल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सी.सी. टी.व्ही कॅमेरे इ. मूलभूत सुविधा या अगदी प्राथमिक अवस्थेत आहेत.
मुसळधार पावसामुळे तेथील मालाचे नुकसान होते. व्यापारी, शेतकरी, माथाडी कामगार यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेती उपयुक्त खते शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध व्हावे व मालाचे नुकसान टाळण्यासाठी शिवणी शिवर येथील रेक पॉईंटवर पायाभूत सुविधांची उभारणी होईपर्यंत रेल्वे प्रशासनाने अकोला रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रेक पॉईंट पुर्ववत सुरू केला आहे. त्यामुळे अकोला येथील मध्य रेल्वे परिसरातील रेक पॉईंटमुळे, अकोला शहरातील रहदारी व प्रवासी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा ह्यांनी आदेश जारी केले आहेत.
आदेशात म्हटल्यानुसार...!
अकोला येथील मध्य रेल्वे परिसरातील मालधक्क्यावरून वाहतूक करणाऱ्या जड वाहनास, मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक असेल.
मध्य रेल्वे परिसरातील मालधक्क्यावरून जड वाहनाद्वारे मालाची वाहतूक ही केवळ रात्री १०.३० वा. ते सकाळी ७.३० या दरम्यान करण्यात यावी. दिवसा सकाळी ७.३० वाजतानंतर जड वाहतूक करता येणार नाही.
शहरामध्ये वाहतूक करतांना वाहतूक अधिनियमामध्ये ठरवून देण्यात आलेल्या तरतुदीप्रमाणे वेग नियंत्रित ठेवावा. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहतुक करता येणार नाही.
वाहतुकीमुळे रस्त्यावरील इतर वाहनांना अडचण होणार नाही. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची संबंधित वाहन चालकाने खबरदारी घ्यावी.
क्षमतेपेक्षा जास्त मालाचे वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्यास वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत दंडात्मक कारवाई करावी.
अकोला शहरातील जड वाहनाचे वाहतुकीवर संबंधित वाहतुक शाखेने नियंत्रण ठेवावे.
या व्यतिरिक्त रहदारी संबंधी शासनाने तयार केलेल्या नियमांचे कटाक्षाने पालन करण्यात यावे, असे आदेशात नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.