अकोला : येथील धरणात यंदा पाहिजे तशी पाण्याची वाढ होत नसल्याने पावसाच्या पाण्यासाठी महान धरण आज रोजी व्याकूळ झाला आहे. पावसाळाला लागून आज पूर्ण ४० दिवस संपली असून, महान धरणात पाहिजे तेवढी वाढ होऊ शकली नाही.
धरणाचे भरावश्यावर अकोला शहरासह मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोला एमआयडीसी आणि नदी काठावरील ६४ खेडी गावातील जनतेची वर्षभर तृष्णा तृप्ती होते. धरणात आजरोजी पाणी पातळी कमी प्रमाणात शिल्लक राहल्याने धरणातील पाणी केवळ अकोला शहरालच पुरवठा करण्यात येत आहे.
गत वर्षी ता. १७ जुलै रोजी महान धरणाची पाणी पातळी ३४३.११ मीटर, ३२.७३४ दलघन मीटर आणि ३७.९० टक्के एवढा जलसाठा उपलब्ध होता. यंदा १७ जुलै रोजी पाणी पातळी ३४१.६८ मीटर, २२.३७० दलघन मीटर आणि २५.९० टक्के एवढा जलसाठा उपलब्ध असून, गत वर्षीचे तुलनेत यंदा १२ टक्के जलसाठा महान धरणात कमी आहे.
यंदा पावसाळ्या गत ४० दिवसात महान धरणाच्या पाणी पातळीत दोन वेळेच्या वाढीत केवळ २६ सेंटीमीटरपर्यंतच वाढ होऊ शकली. महान धरणाच्या पाणी पातळीत भरमसाठ वाढ होण्याकरिता काटा-कोंडाला नदीचे महान धरणात लवकरात लवकर आगमन होणे आजरोजी खूप गरजेचे आहे.
मालेगाव परिसरातील जऊलका, अमांनवाडी, मुसळवाडी, धानोरा, फेट्रा या भागात दमदार आणि मुसळधार पाऊस पडणे अति आवश्यकतेचे झाले आहे. महान धरणाच्या पाठीमागील लहान-मोठी तलाव, धरणे भरल्याशिवाय काटा-कोंडाळा नदीचे महान धरणात आगमन होणार नाही हे विशेष.
मुख्य गेटपासून पाणी चार फूट दूर
महान धरणाला एकूण दहा गेट असून, प्रत्येक गेटचा आकार १६ फूट उंच आणि ४० फूट लांबी आहे. सद्या महान धरणात पाणीसाठा कमी असल्याने धरणाचे पाणी आजरोजी मुख्य गेटपासून चार फूट खाली गेले आहे. मुख्य गेटचे खालच्या टोकाला पाणी टेकण्यासाठी धरणात चार फूट पाणी कमी आहे.
पावसाचे पाणी अडवण्यासाठी महान धरण आजरोजी सज्ज असून, पावसाची आतुरतेने वाट बघत आहे. धरणातील वाढत्या जलसाठ्याकडे उपकार्यकारी अभियंता विशाल कुळकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली धरणाचे कर्मचारी मनोज पाठक, सुखदेव आगे, नाना शिराळे, प्रतीक खरात हे लक्ष ठेऊन आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.