Akola News
Akola News

Akola Riot : रात्रीची संचारबंदी कायम! जुने शहर, डाबकी रोड परिसरात तणावपूर्ण शांतता

Published on

अकोला : शहरातील चार पोलिस स्टेशनच्या हद्दीत १३ मेपासून लागू करण्यात आलेल्या संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. त्यानुसार जुने शहर व डाबकी रोड परिसरातील तणावपूर्ण शांतता बघता रात्रीची संचारबंदी कायम ठेवण्यात आली असून, दिवसा जमाबंदीचा आदेश देण्यात आला आहे.

Akola News
Crime : कारवाईसाठी गेलेल्या अतिक्रमण विभागाच्या सहायक निरीक्षकास मारहाण! पाच जणांना अटक

सिटी कोतवाली व रामदासपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हरीहरपेठ परिसरात दोन समाजात १३ मे रोजी वाद उद्‍भवला होता.

त्यानंतर चार पोलिस स्टेशनच्या हद्दीत संचारबंदी लागू व जमाबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारपासून रामदासपेठ व सिटी कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी मागे घेवून जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला होता.

Akola News
Shivai Electric Video : ST महामंडळाच्या ताफ्यातील 'शिवाईE' पाहिली का? इलेक्ट्रिक बसची झलक

१५ मे रोजी काढलेल्या या आदेशात आता बदल करण्यात आला असून, सिटी कोतवाली व रामदासपेठ पोलिस स्टेशन हद्दीत लावण्यात आलेले जमावबंदी निर्बंध हटविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला.

रात्री ८ ते सकाळी ८ संचारबंदी

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार जुने शहर व डाबकी रोड पोलिस स्टेशन हद्दीत संचारबंदी शिथिल करून ता. १५ मेपासून सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली होती. सोबतच ता. १५ चे रात्री ८ ते ता. १६ मेचे सकाळी ८ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती. ता. १६ मेपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचे आदेश कायम ठेवण्‍यात आले आहे.

...तर होईल कारवाई!

अकोला शहरातील संवेदनशिल भागात येत असलेल्या डाबकी रोड व जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील जमावबंदीचा आदेशा कायम ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()