Akola Riot : सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर! सर्व व्हॉटसअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीन्सला नोटीस

police
policeesakal
Updated on

अकोला : जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टने दोन धर्मात वाद उफाळून आला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता सोशल मीडियावर लक्ष केंद्रीत केले असून, अकोला शहरातील सर्व व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमीनला पोलिस निरीक्षकांनी नोटीस बजावल्या आहेत.

police
Akola Riot : रात्रीची संचारबंदी कायम! जुने शहर, डाबकी रोड परिसरात तणावपूर्ण शांतता

अकोला शहरामध्ये व्हॉटस ॲप ग्रुपव्दारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या दृष्टीने मेसजे केल्यामुळे रामदासपेठ तसेच जुने शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत त्याच्या प्रतिक्रिया उमटून विविध प्रकारचे गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये जिवित व वित्त हानी झाली आहे. त्यामुळे व्हॉटस ॲप ग्रुपबाबत पोलिसांनी माहिती गोळा केली आहे. त्यामध्ये ग्रुप ॲडमिनला नोटीस बजावून आक्षेपार्ह मचकूर व्हायलर होणार नाही याची काळजी घेण्याबाबत बजावण्यात आले आहे.

काय आहे नोटीसमध्ये?

अकोला शहराची परिस्थिती पाहता शुल्लक शुल्लक घटनेवरून जातीय तणाव तसेच दंगली झाल्याचा पूर्व इतिहास आहे. ग्रुप ॲडमिन म्हमून ग्रुपमध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना योग्य सूचना द्याव्यात. कोणीही कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत तसेच समाजा-समाजामध्ये तेठ निर्माण होणार नाही या दृष्टीने ॲडमिन किंवा ग्रुपच्या सदस्यांनी योग्यती दक्षता घ्यावी, अशी सूचना नोटीसमधून देण्यात आली आहे.

police
Pradeep Kurulkar: कुरुलकरांनी डिलीट केलेलं व्हॉट्सॲप ATS ने पुन्हा केलं सुरू; बॅकअप घेताच...

ग्रुप ॲडमिनवर कायदेशिर कारवाई होणार

सर्व सोशल मीडिया ग्रुप ॲडमिनला नोटीस देवून अकोला शहरात शांतता राखण्याचे दृष्टिकोनातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकुर, व्हिडीओ टाकणाऱ्यावर पोलिस प्रशासनाच्या वतीने लक्ष ठेवण्यात येत आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियाचे माध्यमातून चुकीचे संदेश, अफवा पसरविले जातात. त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अफवा पसरविऱ्यांविरुध्द तसेच संबंधित ग्रुप ॲडमिन यांचेवर कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून दिला आहे.

"पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार अकोला शहरांची परिस्थिती तसेच दंगली झाल्याचा पूर्व इतिहास बघता सोशल माध्यमातून कोणीही कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत किंवा समाजामध्ये तेठ निर्माण होणार नाही या दृष्टीने ग्रुप ॲडमिन किंवा ग्रुपमधिल सदस्यांना आवश्यक ती दक्षता घेणयाबाबत नोटीस बजावली आहे. ग्रुप ॲडमिनला बजावण्यात आलेल्या या नोटीस कायदेशिर पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे. त्यामुळे ग्रुप ॲडमिन यांनी सर्व सदस्यांना त्याबाबत सूचना द्याव्यात."

- भाऊराव घुगे, पोलिस निरीक्षक, सिव्हिल लाईन्स, अकोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()