अकोला : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) जिल्ह्यातील निवड यादीत आलेल्या १९१८ विद्यार्थ्यांपैकी १४१९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तर ४९९ जागा प्रवेशासाठी शिल्लक आहेत. निवड यादीतून प्रवेशाची मुदत ८ ऑगस्ट पर्यंत देण्यात आली होती. मुदतवाढ देऊनही ४९९ जागा रिक्त राहिल्याने या जागांवर आता दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.