Akola : दिवाळीमुळे रांगोळीची विक्री तेजीत

दीपावलीसाठी घराला शोभा आणणारी रांगोळी मोठ्या प्रमाणात विकली
diwali rangoli news
diwali rangoli news esakal
Updated on

शिरपूर जैन : दिवाळीसाठी नागरिकांकडून विविध प्रकारची खरेदी केली जात आहे. दीपावलीसाठी घराला शोभा आणणारी रांगोळी मोठ्या प्रमाणात विकली जात आहे. रांगोळी विक्रीची दुकाने तथा हातगाड्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा रांगोळीच्या भावात पंधरा ते वीस टक्क्याने वाढ झाली आहे.

diwali rangoli news
Akola : कृषी विद्यापीठाच्या शिवार फेरीला उदंड प्रतिसाद

तरीही विविध रंगातील रांगोळी खरेदी केली जात आहे. दीपावली पर्वात रंगीबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात. रांगोळीची विक्री चांगली झाल्याचे विक्रेत्याकडून कळते. गतवर्षी पांढरी रांगोळी सरासरी आठ रुपये तर रंगीत रांगोळी त्या पेक्षा महागच विकली गेली होती. यंदा पांढरी रांगोळी १० रुपये किलो तर रंगीत रांगोळी त्याही पेक्षा महाग विकली जात आहे.

diwali rangoli news
Akola : बाळापूर तहसीलवर धडकला स्वाभिमानीचा एल्गार मोर्चा

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाववाढ झाली आहे. रांगोळी बरोबरच आकाशकंदील, पणत्या आदीही विकल्या जात असल्याचे कारागिरकडून सांगण्यात येते. रांगोळीचे ठिपके टाकण्यासाठी व डिझाईन काढण्यासाठी छोटे लांब पेन्सिल सारखे उपकरण बाजारात उपलब्ध आहे.

diwali rangoli news
Akola : शाळा बंद न करण्यासाठी मंत्रिमंडळात घेणार निर्णय : पालकमंत्री संजय राठोड

शिवाय तयार डिझाइनच्या डिजिटल, थ्री डी जाळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोण,डबे, छापे याचाही रांगोळी काढण्यासाठी उपयोग होताना दिसून येत आहे. पूर्वी फक्त ठिपक्यांची रांगोळी पाहायला मिळत होती आता मात्र भरपूर प्रमाणात विविध डिझाईनमध्ये रांगोळी पाहायला मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()