Akola : हिंदू-मुस्लिम ऐक्याला अनोख्या नात्यात गुंफणारी ‘श्री बाळादेवी’

देवीच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांची गर्दी
Akola
Akolasakal
Updated on

बाळापूर : श्री बाळादेवीची महती ही शब्दांत व्यक्त होणार नाही अशीच आहे. तिचा महिमा अपरंपार आहे, अशा या श्री भगवती बाळादेवी चरणी लीन होण्यासाठी भाविकांची नवरात्रात दर्शनासाठी रिघ लागते. शहरात तिचे वास्तव्य असल्यामुळे या शहराला बाळापूर म्हणून ओळखले जाते.

नवसाला पावणारी देवता म्हणून बाळापूर शहरात प्रसिद्ध असलेल्या श्री बाळादेवी संस्थानमध्ये नवरात्र महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. ता. २६ सप्टेंबरला सुरू झालेला नवरात्र महोत्सवाची ता.५ ऑक्टोबर रोजी सांगता होणार आहे. नवरात्रात नऊ दिवस येथे भक्तांची मांदियाळी असते. सकाळपासून रात्रीपर्यंत महिलांची मंदिरात दर्शनासाठी गर्दी होते. श्री बाळादेवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून देवीची ओळख असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. यामुळे देवीकडे भाविक नवस करत असल्याचे सांगण्यात येते. काही भाविक देवीला दंडवत घालतात, तर काही भाविक तासंतास रांगेत उभे राहून देवीच्या दर्शनासाठी उभे असतात.

विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात. शेंदुराचा मुखवटा असलेल्या देवीची महिमा अपरंपार आहे. बाळापूर शहरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या चोहोबाजूंनी मन व महेश नद्यांचा वेढा आहे. या दोन्ही नद्यांच्या मध्यभागी उंच अशा टेकडीवर श्री बालादेवीचे सुंदर मंदिर वसलेले आहे. श्री बालादेवीचे देवस्थान एक जागृत शक्तिपीठ म्हणूनही प्रसिद्ध आहे. बाळापूरवासीयांचे कुलदैवत असलेली श्री बाळादेवीची अख्यायिका अशी आहे की, देवीच्या अख्यायिकाचे वर्णन ब्रम्हांड महापुराणात आढळते. त्या पुराणात श्री ललितो पाठ्यान आहे. त्यातील २२ व्या अध्यायात श्री भगवती बालादेवी मातेने भंडासूर नामक दैत्याच्या ३० पुत्राचा वध केल्याचे सांगितलेले आहे.

बंधुत्वाच्या अनोख्या नात्यात बांधणारी देवता

बाळापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पुरातन आणि ऐतिहासिक असलेल्या बाळापूर शहराची ८० टक्के वस्ती मुस्लिम समाजाची आहे. तरीही बाळापुरची ग्रामदेवता श्री बाळादेवी आहे. त्यामुळे निश्चितच या शहराला मुस्लिम-हिंदू ऐक्य लाभलेलं आहे. इथल्या मुस्लिमांचा बाळादेवीच्या अनेक उत्सवांमध्ये सहभाग असतो, त्यामुळे बाळादेवी या गावाला बंधुत्वाच्या एका अनोख्या नात्यात बांधणारी देवता असल्याचं येथील मुस्लिमांना वाटतं. अतिशय पुरातन आणि ऐतिहासिक वारसा असणाऱ्या बाळापूर या शहराला या देवीच्या नावावरूनच नाव मिळालं आहे. रामदास स्वामी यांनी या देवीची स्थापणा केल्याचे काही जण सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.