मूर्तिजापूर : शहरालगतच्या बँक कॉलनी, ग्रामसेवक कॉलनी, भटोरी नाका, श्रीराम नगर, पुंडलिक नगर परिसरात दूषित पाणीपुरवठा होत असून, भवनसुंदर वानखडे व अजय प्रभे यांच्या घरातील नळाच्या पाण्यात ता. २५ रोजी नारूसदृश कृमी आढळल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिरसो ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या परिसरात सिरसो ग्रामपंचायतीच्या जलकुंभातून पाणीपुरवठा होतो. खांदला धरणातील पाणी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत बायपासवरील जलकुंभात व तेथून सिरसोच्या जलकुंभात येते. या जलकुंभातील पाणी जलवाहिण्यांमधून ग्रामस्थांच्या घराघरात पोचते. काही ठिकाणी जलवाहिणीला गळती लागली आहे, त्यामुळे पाणी दूषित होते.
जलकुंभ पावसाळ्यापूर्वी नित्यनेमाने स्वच्छ न केल्यास दूषित पाण्याचा पुरवठा ग्रामस्थांना होतो, त्यामुळे ग्रास्थांचे आरोग्य धोक्यात येते. नारूसदृश कृमी पाण्यात आढळणे या बेजबाबदारपणाचा परिणाम असल्याचे वास्तव भयंकर आहे. यापूर्वी सुद्धा या भागात काही ठिकाणी असे कृमी आढळले असून, प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. ग्रामसेवक कॉलनीतील व बायपासवरील जलकुंभांची तपासणी करून पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सन २००० मध्ये शासनाने नारू निर्मुलनाची घोषणा करूनही नारू आढळतोच. तो पाण्यातून शरीरात गेल्यास स्नायूत तोंड फसवितो, शरीरावर खाज येते, फोड येतो, तो फुटतो, त्यातून धाग्यासारख्या नारूची शेपटी बाहेर येते, सावधगिरी बाळगून तो बाहेर न काढल्यास तुटून शरीरातच रहातो व वाढतो.
संबंधित यंत्रणेने जलकुंभाची स्वच्छता करावी, ब्लिचींग पावडरचा वापर करावा, गळत्यांची दुरूस्ती करावी, लोकांच्या जीविताशी खेळू नये.
- अजय प्रभे, ग्रामस्थ, भटोरी नाका, सिरसो.
या परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आहे. स्वच्छता मोहीम राबवितांना ग्रामपंचायत प्रशासनाने जलकुंभातील गाळ पूर्णांशाने काढलाच नाही. ब्लिचिंग पावडरचा उपयोग होत नाही. हे विदारक वास्तव आहे.
-भवनसुंदर वानखडे, भटोरी रोड, सिरसो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.